मुंबईत काढली ११ वर्षे!
पत्रकार प्रतीक त्रिवेदी यांनी जेव्हा मंत्र्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. 'तुम्हाला आरसा पाहायला आवडत नाही का? तुम्ही मेकअपलाही नकार दिला?' या प्रश्नावर मंत्री म्हणाले, "मी सकाळ-सकाळ आरसा नाही बघत." तेनजेम इमाना यांनी आपण मुंबईत जवळपास ११ वर्षे राहिल्याचे सांगितले. 'अभिनेता बनण्याची इच्छा झाली नाही?' या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर तर खूपच मजेदार होते. ते म्हणाले, "मला इमारतीच्या लिफ्टमध्ये अनेकदा संधी मिळाली. सिनेमावाल्यांना मी आवडायचो, कारण माझं वजन जास्त होतं. अनेकदा लोकांनी विचारलं, पण माझं मन झालं नाही."
advertisement
करिना कपूर ही आवडती अभिनेत्री
त्रिवेदी यांनी जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या नायिकेबद्दल विचारले आणि 'तुमच्यासमोर ती बसलेली असेल, तर काय बोलाल?' असा प्रश्न विचारला, तेव्हा तेनजेम इमाना यांनी जराही वेळ न घालवता थेट करीना कपूर खानचे नाव घेतले. करीनाचे नाव घेताच त्यांनी जो पुढचा खुलासा केला, त्यावर हॉलमधील सगळेच हसले. ते म्हणाले, "सैफ अली खानवर मी खूप नाराज आहे."
या नाराजीचे कारण विचारले असता, त्यांनी मिश्किलपणे ते सांगण्यास नकार दिला आणि हसून म्हणाले, "मोदीजी ओरडतील!" त्रिवेदी यांना कारण सांगण्याचा आग्रह केला, पण मंत्रीजींनी 'कोपऱ्यात सांगतो' म्हणून नकार दिला.
करीना कपूरबद्दल बोलताना मंत्री पुढे म्हणाले, "करीना कपूरला पाहतो, तेव्हा खूप छान वाटते." त्यांच्या या निरागस आणि मनमोकळ्या उत्तरावर कार्यक्रमातील सगळे पाहुणे फिदा झाले. तेनजेम इमाना यांना सिनेमाचीही खूप आवड आहे. आवडत्या चित्रपटांबद्दल विचारले असता त्यांनी ९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'कयामत से कयामत तक' याचे नाव घेतले. याशिवाय त्यांना सलमान खानचा 'मैने प्यार किया' आणि सनी देओलचा 'बॉर्डर' हे चित्रपटही खूप आवडतात.