सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्यानं नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. सिनेमाच्या क्लॅपबोर्डसोबतचे फोटो शेअर करत खास पोस्टही लिहिली आहे.
( ठरलं! सूरज चव्हाणला भेटला 'बच्चा', अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो )
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीचा नवरा म्हणजेच अभिनेता कपिल होनराव 'राजा शिवाजी' सिनेमात दिसणार आहे. कपिल रितेश देशमुखबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. कपिलने राजा शिवाजीच्या सेटवर आणि मुंबादेवी मंदिराबाहेरचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
advertisement
कपिलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "2024 हे वर्ष माझ्यासाठी थोड कठीण वर्ष होत. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला मनोभावे प्राथना केली होती की, पुढ्याच्या नवरात्रीपर्यंत काही तरी मोठ होऊ दे. आणि ज्यांना पाहुन मी ह्या इंडस्ट्री मधे आलो #myidol अश्या रितेश विलासराव देशमुख ह्याच्या #राजाशिवाजी ह्या चित्रपटाचा मी भाग झालो. रोहन मापुसकर ह्या मराठी मधला सगळायत मोठ्या कास्टिंग डिरेक्टर ने माझं ह्या सिनेमासाठी कास्टींग केलं."
कपिलने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, "शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांसोबत बालपणापासून ज्यांनी योगदान दिलं अश्या मावळ्याची भूमिका मला करायला मिळतेय. आज तुमच्या सोबत हे क्लॅप शेयर करतोय."
कपिलने सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. "घटस्थापनेचा हा दिवस व आज पासून सुरू होणारी नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती व प्रेमाची वृद्धि करो हीच आमच कामना आपणास नवरात्री च्या हार्दिक शुभकामना",असं कपिलनं म्हटलं आहे."
कपिलला राजा शिवाजी या सिनेमात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्याच्या नव्या सिनेमासाठी चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.