"आवाज कहा तक जानी चाहिए? लाहोर तक..." हा डायलॉग बोलताना सनी देओलचे डोळे अश्रूंनी भरले. त्याच्या भावना दाटून आल्या होत्या. डायलॉग बोलून तो खूप शांत झाला. त्यानंतर सनी देओलने कार्यक्रमात देशभक्ती आणि तरुण पिढीबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला, "देश आपल्या आईसारखा आहे आणि आजचा तरुण मागील पिढ्यांप्रमाणेच त्याचे प्रेम करतो आणि त्याचे रक्षण करू इच्छितो. आजच्या तरुण पिढीमध्ये देशाची परंपरा पुढे नेण्याची आणि ती जपण्याची क्षमता आहे. जनरल-झेड म्हणा किंवा इतर काही, ही पिढी आपल्या देशाप्रती जबाबदार आणि संवेदनशील देखील आहे."
advertisement
( Sunny Deol : घराबाहेर आला, हात जोडले अन् XXX, शिव्या देत कुणावर भडकला सनी देओल! VIDEO होतोय व्हायरल )
बॉर्डर 2 च्या टीझर लाँचिंगला सनी देओल वरुण धवन, अहान शेट्टी आणि इतर प्रमुख कलाकारांसह उपस्थित होता. अभिनेता अहान शेट्टी म्हणाला, "चित्रपटादरम्यान मी खूप काही शिकलो. सनी देओल, वरुण धवन, निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला खूप मदत केली. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो."
बॉर्डर 2 हा सिनेमा 1997 मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात सनी देओलने मुख्य भूमिका साकारली होती आणि यावेळीही तो मुख्य भूमिकेत परतला आहे. या चित्रपटात मोना सिंग, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मेधा राणा आणि अन्या सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ब्लॉकबस्टर केसरीचे दिग्दर्शन केले आहे. बॉर्डर 2 हा चित्रपट पुढील वर्षी 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
