बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण अजित दादांच्या निधनाची बातमी ऐकून धक्क्यात आहे. अजित दादांनी सूरज चव्हाणसाठी मागील वर्षभरात खूप मोठी मदत केली होती. सूरज चव्हाणला घर बांधून देण्यात दादांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दादांवर जीवापाड प्रेम करणारा सूरज चव्हाण त्याच्या निधनाची बातमी ऐकून पूर्णपणे खचला आहे.
( माझा देव चोरला! आईबाबांनंतर अजित दादांनाही गमावलं; पूर्णपणे कोलमडला सूरज चव्हाण )
advertisement
अजित दादांच्या आठवणीत सूरज चव्हाण ओक्साबोक्सी रडला. सूरज चव्हाणचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण म्हणाला, "आज माझ्यावर दु:खाचा डोंगर पसरलाय. माझा दिवस खूप वाईट गेलाय. पहिल्यांदाच मी बातमी बघितली बारामतीचे आपले दादा, माझ्या वडिलांसारखे होतेच. त्यांनी मला एवढं मोठं घर दिलं. घर नव्हत खोपटं होतं. पण आधार म्हणून, बाप म्हणून उभं राहिले. माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते माझ्या मनाला माहिती आहे. ते गरिबांसाठी आधार होते, त्यांच्यासाठी ते उभे राहत होते."
"अजित दादांना मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते मला माहितीये. एवढं मोठं साम्राज्य उभं करून गेले, दु:ख देऊन गेले. डोळ्यांतून इतके अश्रू येतायत, मन भरून आलंय, आता काय सांगू."
सूरजने पोस्टमध्ये लिहिलंय, "मित्रांनो माझा देव चोरला आज मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं."
"अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय. माझ्या आई आबा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन . दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचाच सूरज."
