सूरज चव्हाणने काही दिवसांआधी त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा सर्वांना दाखवला. संजना असं सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. संजना ही सूरज चव्हाणच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना ही अत्यंत साधी आणि सूरजला हवी होती तशीच आहे.
( Suraj Chavan Home : सूरज चव्हाणचा बंगला तयार! केला गृहप्रवेश, आलिशान घराचा पहिला VIDEO समोर )
advertisement
सूरज चव्हाणचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणची लग्नाची थेट पत्रिकाच व्हायरल झाली आहे. सूरज चव्हाणच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.
सूरज चव्हाणचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी असून साखरपुडा, हळद आणि लग्न असे तिन्ही महत्त्वाचे कार्यक्रम एकाच दिवशी होणार आहेत. सूरजचं लग्न पुण्यातील सासवड - जेजुरी येथे आहे. 29 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.11 मिनिटांनी सूरज आणि संजनाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. त्याआधी दुपारी 12 वाजता दोघांचा साखरपुडा आणि दुपारी 2 वाजता दोघांना हळद लागणार आहे.
सूरज चव्हाणचं लग्न कसं, आणि किती धामधुमीत होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सूरजच्या लग्नासाठी सिनेसृष्टीतील अनेक मोठी कलाकार मंडळी उपस्थिती लावणार आहेत. त्याचप्रमाणे सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी मदत करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सूरज चव्हाणच्या लग्नाला उपस्थिती लावणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
