सूरजचा हा व्हिडीओ व्हायरल
रीलस्टार महेश जगदाळे आपल्या आजीला घेऊन सूरजच्या घरी गेला होता. त्यावेळी आई आणि सूरजमधील संवादाने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओच्या सुरुवातीला सूरज आजीला आपल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहे. त्यावर आजी म्हणतेय,"आता काय करायचं? कशाला काढलीस?. त्यानंतर महेश संजनाच्या हातावरील मेहंदी दाखवत म्हणतो,"सूरजचं कसलं प्रेम आहे. पाहिलं का? केवढी मेहंदी रंगली आहे?".
advertisement
सूरज आणि संजना पुढे आजीच्या पाया पडतात. आजीदेखील तुमचं खूप कल्याण होईल, असं म्हणत नव्या जोडप्याला शुभेच्छा देते. पुढे सूरजची बहिण आजीला लग्नाला का आला नाहीत? असं विचारते. त्यावर आजी म्हणते,"पूजेला यायचं होतं. म्हणून लग्नाला आलो नाही".
सूरजला हवी दोन मुलं
महेश जगदाळे पुढे आजीला सूरजला पहिलं मुलगा व्हायला हवा की मुलगी? असं विचारतो. त्यावर उत्तर देत आजी म्हणते,"पहिलं मुलगा आणि मग मुलगी". पुढे महेश म्हणतो,"सूरज म्हणतोय की त्याला चार मुलं हवी आहेत". त्यानंतर सूरज आणि संजना खूप लाजतात. सूरज आजीला उत्तर देत म्हणतो की "दोन". आजी पुढे म्हणते,"हो. आधी मुलगा आणि मग मुलगी". या व्हिडीओवरुन हे स्पष्ट होतं की सूरजला आता लग्नानंतर दोन मुलं हवी आहेत".
