सूरजची सुगरण बायको!
सूरज चव्हाणची बायको संजना हिचा लग्नानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संजना लग्नानंतर कामाला लागलेली दिसत आहे. सूरज आणि संजना यांच्या लग्नाला तीन दिवस झाले आहेत. लग्नाच्या तीन दिवसांनंतर संजना लगेचच कामाला लागली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये संजना हसत-हसत कोथिंबिर निवडताना दिसत आहे.
advertisement
सूरज चव्हाणला खाणं प्रचंड आवडतं. घरचं अन्न खायला तो पसंती दर्शवत असतो. व्हेजपेक्षा नॉन-व्हेज खायला त्याला जास्त आवडतं. आता लग्नानंतर संजना सूरजची काळजी घेताना दिसत आहे. त्याच्या आवडीचे पदार्थ ती त्याला बनवून देत आहे.
सूरज आणि संजनाची फिल्मी लव्हस्टोरी
सूरज आणि संजना यांचं लव्हमॅरेज आहे. संजना गोफणे ही सूरजच्या मामाची मुलगी आहे. दोघेही एकमेकांना बालपणीपासून ओळखतात. बालपणी एकमेकांसोबत खेळताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्या नात्याला हिरवा कंदील दाखवला आणि आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. सूरज आणि संजनावर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूरज लग्नानंतर हनिमूनला महाबळेश्वरला जाणार आहे. लग्नानंतर लगेचच त्याने दोन मुलं हवी असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. चाहत्यांप्रमाणे सूरज स्वत: ही त्याच्या लग्नासाठी खूप उत्सुक होता. अखेर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत तो बोहल्यावर चढला.
