TRENDING:

Suraj Chavan : लाडक्या भावासाठी अंकिता वालावलकरने घातलं केळवण, सूरज चव्हाणने होणाऱ्या बायकोसाठी घेतला हटके उखाणा

Last Updated:

Suraj Chavan Marriage : सूरज चव्हाण लवकरच त्याची होणारी बायको संजना हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असून अंकिता वालावलकरने सूरज आणि त्याची होणारी पत्नी संजनासाठी खास केळवणाचा घाट घातला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी सिझन ५'चा विजेता आणि गुलीगत फेम अभिनेता सूरज चव्हाण याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोड बातमीमुळे सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केल्यापासून सूरजच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती, आणि आता ही चर्चा खरी ठरली आहे. सूरज चव्हाण लवकरच त्याची होणारी बायको संजना हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
News18
News18
advertisement

'बिग बॉस'च्या बहिणीकडून गुडन्यूज कन्फर्म

सूरजला त्याची लाईफ पार्टनर कधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर, ही बातमी सूरजच्या 'बिग बॉस'मधील खास बहिणीने म्हणजेच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अंकिता वालावलकर, म्हणजेच कोकण हार्टेड गर्लने कन्फर्म केली.

नुकतीच अंकिता सूरज चव्हाणला भेटायला त्याच्या घरी, बारामतीला गेली होती. यावेळी तिने संजनाची भेट घेतली होती आणि सुरजच्या नव्या घराची पाहाणी केली होती. अशातच आता तिने सूरज आणि त्याची होणारी पत्नी संजनासाठी खास केळवणाचा घाट घातला. अंकिताने सोशल मीडियावर केळवणाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, 'सूरजचं लग्न ठरलं' या बातमीवर शिक्कामोर्तब केले.

advertisement

सई ताम्हणकर-Smriti Mandhana ची सेम टू सेम चॉईस, सांगलीसोबत खास कनेक्शन, दोघींनाही आवडते एकच गोष्ट

सूरज चव्हाण आणि संजना यांच्या केळवणाच्या व्हिडिओमध्ये दोघांनीही एकमेकांसाठी घेतलेले उखाणे खूपच गमतीशीर आणि हटके ठरले आहेत. बिग बॉस जिंकून आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या सूरजने आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी हटके उखाणा घेतला. तो म्हणाला, "बिग बॉस जिंकून पूर्ण झालं माझं स्वप्न, संजनाचं नाव घेतो... बोललो होतो ना, आधी करिअर मग लग्न!"

advertisement

संजनाही काही मागे राहिली नाही. तिनेही लगेचच भन्नाट उखाणा घेतला, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. संजना म्हणाली, "बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सुरजचं नाव घेते, मीच त्याची होणारी बायको!"

अंकिताने घातला शाही बेत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोटासाठी किती दिवस रस्त्यावर नाचायचं? डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
सर्व पहा

अंकिता वालावलकरने आपल्या भावाच्या केळवणासाठी घराची सुंदर सजावट केली होती आणि चविष्ट जेवणाचा बेत केला होता. तिने दोघांनाही ओवाळून भेटवस्तू दिल्या आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूरज आणि संजनाच्या केळवणाच्या या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असून त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan : लाडक्या भावासाठी अंकिता वालावलकरने घातलं केळवण, सूरज चव्हाणने होणाऱ्या बायकोसाठी घेतला हटके उखाणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल