सुशांतने फार कमी वेळात आपल्या अभिनयाची छाप सोडली. चाहत्यांच्या हृदयात त्याने वेगळं स्थान निर्माण केले. एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी, छिछोरे, केदारनाथ, काई पो छे यांसारख्या अनेक चित्रपटांमधून सुशांतने त्याचं कसब दाखवून दिलं. प्रत्येक सिनेमात त्याने आपली व्यक्तिरेखा केवळ जगलीच नाही तर पडद्यावर ती अतिशय तीव्रतेने साकारण्यातही तो यशस्वी ठरला.
advertisement
Sushant Singh Rajput: मल्टिटॅलेंटेड सुशांत..! अभिनयच नाही तर अभ्यासतही स्टार, वाचा काय-काय शिकला?
अभिनयाबरोबरच त्याला अनेक गोष्टी शिकण्याची उत्सुकता असे. सुशांत सिंग राजपूत २००३ मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग प्रवेश परीक्षेत देशात सातवा आला होता. यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, पण तिसऱ्या वर्षात त्याने अभ्यास सोडून अभिनयाला सुरुवात केली. तो भौतिकशास्त्रात राष्ट्रीय ऑलिंपियाड विजेताही होता. त्याने आयएसएम धनबादसह सुमारे ११ अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या.
इतकंच नाही, तर सुशांत त्याच्या दोन्ही हाताने लिहू शकत होता. त्याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो त्याच्या दोन्ही हातांनी लिहिताना दिसत आहे. यावेळी तो “छिछोरे” या सिनेमाचं शूटिंग करत असल्याचे समजते.
“पवित्र रिश्ता” ही सुशांतची पहिली मालिका नसली तरीही त्याला याच मालिकेतून ओळख मिळाली. या मालिकेतील सुशांत आणि अंकिताची जोडी सगळ्यांना खूपच आवडली होती. लोक आजही त्याची खूप आठवण काढताना दिसतात.
