रोबो शंकर असं प्रसिद्ध कॉमेडियनचं नाव आहे. तो प्रसिद्ध तमिळ कलाकार होता. गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी चेन्नई येथं त्याचं निधन झालं. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने चाहते आणि जवळचे मित्र शोक व्यक्त करत आहेत. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. रोबो शंकरच्या निधनाने अभिनेते रजनीकांत यांनाही शोक व्यक्त केला आहे.
advertisement
( हिरोईन म्हणून फ्लॉप, आयटम नंबरने एका रात्रीत केलं स्टार; 'खल्लास गर्ल' आता करते काय?)
मिळालेल्या माहितीनुसार, रोबो शंकर शूटींगच्या सेटवर बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किडन फेल झाली होती. बुधवारी त्याची प्रकृती आणखी ढासळली. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते मात्र रात्री 8.30 त्याने अखेरचा श्वास घेतला.
शंकर यांना त्यांच्या सिग्नेचर रोबोट-शैलीतील डान्सवरून 'रोबो' हे नाव मिळालं होतं. 2000 च्या दशकात छोट्या भूमिकांमधून त्याने कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने स्टार विजय कॉमेडी शो 'कलक्का पोवाथु यारू' मधून लोकप्रियता मिळवली. 'इधारकुठणे असैपट्टई बालकुमार' आणि 'वायई मूडी पेशवुम' सारख्या चित्रपटांद्वारे त्याने मोठे यश मिळवले.
रोबो शंकर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. 'वेलाईनु वंदुत्ता वेल्लैकरन', 'कडावुल इरुकन कुमारू', 'सिंगम 3', 'विश्वासम' आणि 'कोब्रा' सारख्या हिट चित्रपटांमध्ये तो दिसला. अभिनेत्याच्या भूमिकांपैकी, धनुषच्या 'मारी' मधील त्याची विनोदी भूमिका अजूनही चाहत्यांना सर्वात जास्त आवडते, जरी कावीळच्या दीर्घ उपचारांमुळे त्याची कारकीर्द खंडित झाली होती.
शंकरने जोरदार पुनरागमन केले. त्याच्या आजारामुळे त्याचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. रोबो शंकरच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रियंका शंकर आणि मुलगी इंद्रजा शंकर आहेत. त्याच्या अचानक निधनाने तमिळ चित्रपट उद्योग आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.