अलीकडेच, दिशाचा रिअल आणि ऑन-स्क्रीन भाऊ मयूर वाकानी (सुंदरलाल) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की दिशा आता शोमध्ये परतणार नाही. कारण सध्या ती तिच्या लहान मुलांमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे आणि आईची भूमिका मनापासून निभावत आहे.
'मी विराटला चांगलं ओळखतो' अनुराग कश्यपचं कोहलीविषयी मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
advertisement
मयूर पुढे म्हणाले, “मी तिचा प्रवास जवळून पाहिलाय. ती खूप मेहनती आहे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे तिला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. सध्या मात्र तिचं लक्ष फक्त आईपणावर आहे. ती ही भूमिकाही तितक्याच समर्पणाने निभावत आहे.”
याआधी, शोचे निर्माता असित मोदी यांनीही स्पष्ट केलं होतं की दिशासाठी परत येणं कठीण आहे. ते म्हणाले होते, “लग्नानंतर स्त्रियांचं जीवन बदलतं. लहान मुलं आणि घर सांभाळत असताना काम करणं अवघड होतं. पण तरीही मला वाटतं की एखाद्या दिवशी देव चमत्कार करेल आणि ती परत येईल.”
दयाबेन शोमध्ये नसली तरी, ‘तारक मेहता’ आजही टीआरपी चार्टवर टॉपवर आहे. आता हा शो केवळ एका पात्राभोवती फिरत नाही, तर गोकुळधाम सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या कथा, समस्या आणि आनंद दाखवतो.