Virat Kohli : 'मी विराटला चांगलं ओळखतो' अनुराग कश्यपचं कोहलीविषयी मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हे त्यांच्या हटके सिनेमांसाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते सतत वेगळ्या विचारांमुळे चर्चेत येतात.
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हे त्यांच्या हटके सिनेमांसाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते सतत वेगळ्या विचारांमुळे चर्चेत येतात. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहली याबद्दल मोठं विधान केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
filmygyan ला दिलेल्या मुलाखतीत अनुरागला विचारण्यात आलं की, “तुम्हाला विराट कोहलीवर बायोपिक बनवायला आवडेल का?” त्यावर तो म्हणाला, "विराट कोहली आधीच सुपरस्टार आहे. तो लाखो लोकांचा हिरो आहे. त्याचं आयुष्य लोकांना माहित आहे. माझ्या मते, बायोपिक त्या व्यक्तींवर व्हायला हवेत ज्यांनी मोठं काम केलंय, पण ज्यांच्याबद्दल जगाला माहितीच नाही.”
advertisement
अनुराग पुढे म्हणाले की, “मी विराटला चांगलं ओळखतो. तो खूप भावनिक, प्रेरणादायी आणि अविश्वसनीय व्यक्ती आहे. पण जर मला बायोपिक बनवायचाच असेल तर मी अशा व्यक्तीवर करेन ज्याने समाजासाठी काहीतरी मोठं काम केलंय, पण तो अजूनही गुप्त आहे. लोक त्याचं नावसुद्धा ओळखत नाहीत.”
अनुराग कश्यप यांचे हे विधान ऐकून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. अनेकांना वाटलं होतं की ते विराटसारख्या मोठ्या स्टारवर बायोपिक करायला तयार होतील. पण दिग्दर्शक मात्र त्यांची ओळख सांगणाऱ्या अनामिक लोकांच्या कहाण्या मोठ्या पडद्यावर आणू इच्छितात.
advertisement
कामाबद्दल बोलायचं झालं तर अनुराग कश्यप सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘निशांची’ मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात बाळ ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आणि अभिनेत्री वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 12:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Virat Kohli : 'मी विराटला चांगलं ओळखतो' अनुराग कश्यपचं कोहलीविषयी मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?