BREAKING : आयुष कोमकर हत्याकांडाचा मास्टरमाइंड अटकेत, कृष्णा आंदेकरला ठोकल्या बेड्या

Last Updated:

पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. आंदेकर टोळीने पाळत ठेवून आयुष कोमकर गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणाचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

News18
News18
पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. आंदेकर टोळीने पाळत ठेवून आयुष कोमकर गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर आणि इतर अकरा जणांचा समावेश होता. या पूर्वी पुणे पोलिसांनी एकूण १२ जणांना अटक केली आहे.
या अटकेनंतर आता या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकरला देखील बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णा आंदेकर हा मागील वर्षी हत्या झालेल्या वनराज आंदेकरचा भाऊ आहे. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी त्याने हे आयुष कोमकरची हत्या घडवून आणल्याचं सांगितलं जातंय. ५ सप्टेंबरला आयुष कोमकरची हत्या झाल्यापासून कृष्णा आंदेकर फरार होता. पुणे पोलिसांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
advertisement
कृष्णा आंदेकरने पोलिसांकडे सरेंडर व्हावं, यासाठी पोलिसांचा दबाब होता. पोलिसांकडून एन्काऊंटरची धमकी देखील देण्यात आली होती, असा दावा बंडू आंदेकरने सोमवारी कोर्टात केला होता. या दाव्यानंतर अवघ्या काही तासांत कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर गुडघे टेकले आहेत. त्याने आज सकाळी समर्थनगर पोलीस ठाण्यात हजर होत, स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कृष्णा आंदेकरच्या अटकेची कारवाई पूर्ण केली.
advertisement
आज सकाळी कृष्णा आंदेकरला अटक केल्यानंतर त्याला लवकरच न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कृष्णा आंदेकर मागील अकरा दिवसांपासून कुठे होता? त्याला लपण्यासाठी कुणी मदत केली? त्याचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात काय हात आहे? याचा सविस्तर तपास आता पुणे पोलीस करत आहेत. एकूणच आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
BREAKING : आयुष कोमकर हत्याकांडाचा मास्टरमाइंड अटकेत, कृष्णा आंदेकरला ठोकल्या बेड्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement