जिथं झाली बायकोची हत्या, त्या घराचं 26 वर्षे कोट्यवधीचं भाडं देत राहिला नवरा; आठवण नाही तर वेगळंच कारण

Last Updated:

Husband Wife News : खरंतर तो तिथं राहतही नव्हता. बायकोची हत्या झाली ते घर नवऱ्याने भाड्याने घेण्यामागे वेगळंच कारण होतं. असं कारण की समजल्यानंतर प्रत्येक जण इमोशनल होईल. जपानमधील हे प्रकरण आहे.

News18
News18
टोकियो : जिथं बायकोची हत्या झाली ते घर नवऱ्याने भाड्याने घेतलं म्हणजे त्या नवऱ्याने बायकोच्या आठवणीत ते घर घेतलं असावं असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही. खरंतर तो तिथं राहतही नव्हता. बायकोची हत्या झाली ते घर नवऱ्याने भाड्याने घेण्यामागे वेगळंच कारण होतं. असं कारण की समजल्यानंतर प्रत्येक जण इमोशनल होईल. जपानमधील हे प्रकरण आहे.
13 नोव्हेंबर 1999. ताकाबाची पत्नी नामिको त्यांच्या 2 वर्षांच्या मुलासह घरी होती. कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला. नामिकोवर अनेक वेळा क्रूरपणे चाकूने वार करण्यात आले, तर तिचा मुलगा तिच्या शेजारी जिवंत आणि सुरक्षित आढळला. या बातमीने संपूर्ण परिसर हादरून गेला. पण आश्चर्य म्हणजे जिथं पत्नीची हत्या झाली ते घर ताकोबाने भाड्याने घेतलं. गेली 26 वर्षे तो या घराचं कोट्यवधी रुपयांचं भाडं भरत राहिला.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणात खूप मेहनत घेतली. 1 लाख पोलीस तैनात केले, 5000 लोकांची चौकशी केली, पण कोणताही सुगावा लागला नाही. हळूहळू केस थंडावत चालली होती. पण ताकाबाने ठरवलं की तो ही केस कधीही संपू देणार नाही. तो आणि त्याचा मुलगा दुसऱ्या ठिकाणी गेले, त्याने ते घर त्याच स्थितीत सोडलं, रक्ताचे डागही काढले नाहीत. पण त्या घराचं भाडं देत राहिले. 26 वर्षांत त्याने सुमारे 22 दशलक्ष येन म्हणजे 1.2 कोटी रुपयांपेक्षा जास्त फक्त भाड्यावर खर्च केले.
advertisement
त्याने पत्रकं वाटली आणि माध्यमांशी संवाद साधला, जेणेकरून प्रकरण कुणी विसरू नये, त्याने दुसरं लग्नही केलं नाही कारण त्याच्या जीवनातील एकमेव उद्देश होतं, पत्नीचा मारेकरी शोधणं.
गेल्या वर्षी पोलिसांनी हा खटला पुन्हा उघड केला. तपासादरम्यान एक नाव समोर आलं. कुमिको यासुफुकु (वय 69). 30 ऑक्टोबर रोजी कुमिको स्वतः पोलिसांकडे गेली. ती ताकाबाची शाळेतील मैत्रीण होती, ती ताकाबावर खूप प्रेम करत होती, तिला चॉकलेट आणि पत्रं पाठवत होती, पण ताकाबाने तिचा प्रस्ताव नाकारला होता. यामुळे तिने नामिकोची हत्या केली. डीएनए चाचण्यांमधून पुष्टी झाली की घटनास्थळी सापडलेलं रक्त तिचंच आहे. आता तिला शिक्षा देण्याची तयारी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जिथं झाली बायकोची हत्या, त्या घराचं 26 वर्षे कोट्यवधीचं भाडं देत राहिला नवरा; आठवण नाही तर वेगळंच कारण
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement