अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते अजिंक्य रमेश देव हे या सिनेमात काम करणार आहे. 'असा मी तशी मी' असं सिनेमाचं नाव आहे. 62 वर्षांच्या अंजिक्य देव यांच्याबरोबर तेजश्रीची मोठ्या पडद्यावर रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. लंडनच्या मोहक लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर आणि भावनिक वळणांनी सजलेली ही कथा आहे.
advertisement
यूकेमधील भव्य लोकेशन्स, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, आलिशान प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि मनाला भिडणारा रोमान्स सिनेमात पाहायला मिळणार आहे. या ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो अभिनेते अजिंक्य रमेश देव एक भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. अत्यंत देखणा, स्टायलिश आणि थोडासा कॅसानोव्हा स्वभावाचा हा हिरो आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम मोकळं, धडाडीचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं दाखवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून दिसते जी लंडनमध्ये स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवते. एक अविवाहीत, आयुष्यात एकटेपण अनुभवणारा, तर दुसरीकडे लग्न मोडलेली एक मुलगी जी तिच्या स्वप्नांच्या मागे धावतेय. ट्रेलरच्या शेवटी एक अनपेक्षित वळणं येतं आणि तेजश्री अजिंक्यला सोडून जाताना दिसतेय.
लंडनच्या चमचमणाऱ्या लोकेशन्समुळे त्यांच्या प्रेमाची प्रत्येक फ्रेम अधिकच उठून दिसते. मराठी सिनेमात पहिल्यांदाच इतक्या ग्रँड स्केलवर चित्रिकरण करण्यात आले आहेत. रोल्स रॉयसची लक्झरी, प्रसिद्ध हेरिटेज लोकेशन असलेला हार्टलेबरी कॅसलचे राजेशाही वैभव आणि इतर अप्रतिम लोकेशन्समुळे प्रत्येक फ्रेमला भन्नाट आंतरराष्ट्रीय भव्यता लाभली आहे.या निर्णयामागचं कारण काय? हे रहस्यच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरतं.
विशेष बाब म्हणजे चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला असून, ज्यूरी आणि प्रेक्षकांकडून त्याला विशेष दाद मिळाली. अमोल शेटगे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत अनेक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर हे कलाकारही यात महत्त्वाच्या भुमिकेत आहेत. येत्या 28 नोव्हेंबर 2025 ला 'असा मी अशी मी' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
