अभिनेत्री तेजश्री प्रधान ही प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजश्री सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तेजश्रीच्या आतापर्यंतच्या भूमिका, तिची बोलण्याची पद्धत नेहमीच प्रेक्षकांना आवडत आली आहे. तेजश्रीचं स्मित हास्य देखील प्रेक्षकांना नेहमीच आवडत आलं आहे. तेजश्रीचा एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तेजश्रीचा एक वेगळात अंदाज पाहायला मिळतोय.
advertisement
( Tejashri Pradhan Education : तेजश्री प्रधानचं शिक्षण किती झालंय? सतत देत असते मोटिवेशनचे डोस )
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्य लग्नसोहळा विशेष एपिसोड सुरू आहे. मालिकेचं शूट संपवून तेजश्री घरी निघाली होती. ती तिच्या कारमध्ये बसली. तिला समोर पापाराझी दिसले. त्यांना हाय करण्यासाठी ती कारची काच खाली करायला गेली. काच खाली करायला गेल्या नंतर तेजश्रीच्या लक्षात आलं की आपल्याकडे कारची चावीच नाहीये. चावी न घेताच तेजश्री कारमध्ये बसली होती. हा फनी मुमेन्ट आणि तेजश्रीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे आहेत.
आपल्याकडे कारची चावीच नाहीये हे लक्षात आल्यानंतर तेजश्री कारचा दरवाजा उघडते आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला सांगते, "ऐका ना माझ्या गाडीची चावी नाहीये माझ्याकडे..." हे सांगताना तेजश्रीलाही हसू आवरत नाही. दुसरी व्यक्ती गाडीची चावी घेऊन येते आणि तीही तेजश्रीबरोबर हसू लागते.
तेजश्री "मी त्यांना हाय करतेय, काच खाली करायला गेले तर चावीच नाहीये माझ्याकडे", असं त्या व्यक्तीला हसत सांगते. तेजश्रीनंतर कारमध्ये बसते, कार सुरू करते, काच खाली करते आणि पापाराझींना हाय करत "आता काच खाली आहे" असं सांगते. तेवढ्यात अभिनेत्री किशोरी अंबिये यासुद्धा कारमध्ये बसतात. तेजश्री त्यांनाही घडलेला प्रसंग हसत हसत सांगताना दिसते. मग दोघीही पापाराझींना बाय म्हणत कारमधून निघून जातात.
तेजश्रीच्या आतापर्यंतच्या व्हिडीओमधील हा सगळ्यात क्यूट व्हिडीओ असल्याचं म्हणत चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. थेडासा वेंधळेपणा चालतो कधी कधी म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "ती सध्या काय करते, गाडीची चावी विसरते."
