Tejaswini Pandit : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने चाहत्यांसह संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. आता आईच्या अचानक झालेल्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने चाहत्यांनाही मोलाचा सल्ला दिला आहे. तुमचे आई-वडील हयात असतील तर त्यांच्यासाठी ठरवलेल्या गोष्टी त्यांच्या हयातीत करा, असं अभिनेत्री म्हणाली. तसेच ज्योती चांदेकर यांच्या कारकिर्दीला 50 वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला आहे. त्यामुळे तेजस्विनीला कायमच आपल्या आईचा अभिमान वाटतो.
advertisement
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी पंडित म्हणाली,"मला असं वाटतं की जर तुमचे आई-वडील हयात असतील तर त्यांच्या हयातीत गोष्टी करा. मला आणि माझ्या बहिणीला खूप गोष्टी आईसोबत करायच्या होत्या. आमचे वडील गेले तेव्हा त्यांच्यासोबत करायच्याही गोष्टी राहुन गेल्या होत्या. त्यामुळे आईसोबत तरी त्या गोष्टी करूयात असं आम्हाला झालं होतं. आईच्या वाढदिवशी आम्ही तिच्यावरचं एक पुस्तक प्रदर्शित करणार होतो. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जर तुमच्या कुटुंबियांसोबत काही गोष्टी ठरवल्या असतील. तर त्या करुन टाका. कारण खरचं म्हणजे आयुष्याचा काही नेम नाही".
Nilesh Sable : डॉ. निलेश साबळेंच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू केला नवा व्यवस्याय; नाव ठेवलंय खूपच खास
आईच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावूक
तेजस्विनी म्हणते,"आईच्या कारकिर्दीला आता जवळजवळ 50 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तिची सुरुवात नाटकापासून झाली. नाटक, चित्रपट आणि मालिका असा प्रवास तिचा सुरू झाला. माझ्या आईने एकही माध्यम सोडलं नाही. ज्या-ज्या माध्यमांमध्ये तिने काम केलंय त्या माध्यमांत तिला पुरस्कार मिळाले आहेत. तिच्या पोटी जन्माला येणं हे खरंच मी माझं भाग्य अहोभाग्य समजते. एका इतक्या श्रेष्ठ आणि मोठ्या कलाकाराच्या पोटी आपण जन्म घेतो आणि त्यानंतर तिचं कार्य पुढे नेतो, असं मी म्हणेन. मी पूर्णपणे हे करण्याचा प्रयत्न करतेय. काही अंशी कदाचित मी त्यात यशस्वी झाले असेल. अजून बराच पल्ला गाठायचा आहे".
तेजस्विनी पुढे म्हणाली,"मी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा मी ज्योती चांदेकरांची मुलगी आहे, असं मी कधीच सांगितलं नाही. कारण मला माझं नाव बनवायचं आहे. ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून ओळखलेलं मला चालणार नाही, मला तेजस्विनी पंडित म्हणून नाव कमवायचं आहे, असं मी आईला सांगितलं होतं. यावर आईनेही मला मोकळा हात दिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या माझ्या यशात माझ्या आईचा सहभाग आहे".