'द फॅमिली मॅन 3'ला रुकमा कसा मिळाला?
प्रत्येक वेगळ्या भूमिकेमध्ये उठून दिसणारे जयदीप अहलावत 'द फॅमिली मॅन 3'मध्ये नॉर्थ-ईस्टचा सर्वात मोठा ड्रग डीलर रुकमा बनले आहेत. त्यांचे लांब केस, ढगळ कपडे हा लूक प्रचंड चर्चेत आहे. साधारणपणे प्रत्येक कॅरेक्टरसाठी लूक टेस्ट केली जाते, पण रुकमा या भूमिकेसाठी निर्मात्यांना काहीच करावे लागले नाही. जयदीप अहलवत यांचा इंस्टाग्राम स्क्रोल करताना त्यांना हा लूक सहज मिळून गेला.
advertisement
एनडीटीव्हीशी बोलताना राज अँड डीके यांनी रुकमाच्या लूकविषयी सांगितले की, त्यांना ना लूक टेस्ट करावी लागली, ना कोणताही प्रयोग. ते जयदीपचं इंस्टाग्राम पाहत होते, तेव्हा त्यांना एक फोटो दिसला आणि तो पाहताच त्यांना कॅरेक्टरचा लूक स्पष्ट झाला.
इंस्टाग्रामवर मिळाला रुकमाचा लूक
डीके म्हणाले,"जयदीपने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, जो त्यांनी कधीतरी शूट केला असावा. आपण त्यांना शेवटचं 'पाताल लोक'मध्ये हातीराम म्हणून पाहिलं होतं. आम्हाला असा लूक हवा होता, जो हातीराम चौधरीपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. आमच्या टीमला इंस्टाग्रामवर त्यांचा तो फोटो सापडला. फोटो पाहताच आम्ही ठरवलं बस, असाच लूक हवा! जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा तो फोटो दाखवला आणि म्हटलं,'हा लूकच करायचा आहे.' तेव्हा त्यांच्या मनात आलं असेल की पुन्हा केस वाढवावे लागणार".
जयदीप अहलावत यांना विग आवडत नाही
जयदीप म्हणाले,"हो, मला वाटलं की पुन्हा केस वाढवावे लागतील. पण शेड्यूलनुसार ते शक्य नव्हतं. बरीच चर्चा केल्यानंतर ठरलं की विग ट्राय करू. पण मला विग अजिबात आवडत नाही. खूप त्रासदायक असते. खूप घाम येतो… पण शेवटी आम्ही तेच केलं. विगचा वापर केलाच".
