TRENDING:

"अभी नहीं तो कभी नही...", अंगावर काटा येणारा The Kerala Story 2: Goes Beyond चा लक्षवेधी टीझर

Last Updated:

लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेल्या 'द केरला स्टोरी'च्या सीक्वेलचा टीझर रिलीज झाला आहे. काही तासांपूर्वीच टीझर रिलीज झाला असून पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये चर्चा पाहायला मिळते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी'च्या अभूतपूर्व यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला 'द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड' (The Kerala Story 2: Goes Beyond) चित्रपट येणार आहे. 'द केरला स्टोरी'चा हा सीक्वेल असून प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर 'द केरला स्टोरी 2'चा टीझर रिलीज झाला आहे. उल्का गुप्ता, आदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या तीन अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'द केरला स्टोरी' मधील एकही सेलिब्रिटी चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसत नाहीयेत.
"अभी नहीं तो कभी नही...", अंगावर काटा येणारा The Kerala Story 2: Goes Beyond चा लक्षवेधी टीझर
"अभी नहीं तो कभी नही...", अंगावर काटा येणारा The Kerala Story 2: Goes Beyond चा लक्षवेधी टीझर
advertisement

'द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड'ची विपुल शाहने निर्मिती केली असून दिग्दर्शन कामख्या सिंग यांनी केले आहे. 2023 साली रिलीज झालेल्या 'द केरला स्टोरी' च्या सीक्वेलचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. टीझरच्या सुरुवातीला तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये उल्का गुप्ता, आदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या तीन अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. अतिशय गंभीर आणि खळबळजनक दृश्यांच्या ह्या टीझरने सर्वांचेच लक्ष वेधले. टीझरच्या शेवटच्या भागात "आमच्या मुली प्रेमात पडत नाहीत, तर जाळ्यात अडकतात. आता सहन करणार नाही... लढणार!" या टॅगलाईनने सर्वांचेच लक्ष वेधले. खरंतर, हिच चित्रपटाची टॅगलाईन आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

दरम्यान, टीझरमध्ये तीन तरुणींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतराच्या माध्यमातून शोषण केले जाते. या तिघी त्यांचं भयानक वास्तव टीझरमधून प्रेक्षकांच्या समोर आणना दिसत आहेत. टीझरच्या माध्यमातून असं कळतंय की, या तीनही मुली आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कथा सांगायला आल्या नसून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधातील लढाई लढायला आल्या आहेत. "अभी नहीं तो कभी नही..." या वाक्याने त्यांनी टीझरचा शेवट केला आहे. निर्मात्यांनी टीझरच्या शेवटी चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली आहे. हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाला पूर्वी अनेकजण प्रोपोगंडा फिल्म म्हणून म्हणत होते. पण त्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिकची कमाई केली होती. 'द केरला स्टोरी' प्रमाणेच या चित्रपटाचा सीक्वेल सुद्धा लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरच आधारित त्यामुळे आता 'द केरला स्टोरी 2' सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
"अभी नहीं तो कभी नही...", अंगावर काटा येणारा The Kerala Story 2: Goes Beyond चा लक्षवेधी टीझर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल