ओडिशामधील एका थिएटरमध्ये 'द राजा साब' सिनेमा सुरू असताना चाहत्यांनी थेट कन्फेटीला आग लावल्याचा प्रकार घडला. उडीसा येथील अशोक थिएटरमध्ये ही घटना घडल्यातं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात प्रेक्षक मोठ्या पडद्यावर 'द राजा साब' पाहत असताना काही लोक स्क्रीनसमोर रंगीत कागद म्हणजेच कन्फेटी पेटवत असल्याचं स्पष्ट दिसतं. या प्रकारामुळे थिएटरमधील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
advertisement
( प्रभासच्या या फिल्मने Dhurandhar ला टाकलंय मागे, ओपनिंग डेला केला हा रेकॉर्ड )
प्रभासची फॅन फॉलोइंग किती प्रचंड आहे. प्रभासचा सिनेमा कसा ही असो त्याचे चाहते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. अशा प्रकारामुळे मोठा अपघात घडू शकला असता अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर संपात व्यक्त करण्यात आला आहे. एका युझरनं लिहिलंय, "ही प्रभासच्या फॅन्सची मॅच्युरिटी आहे का? मी प्रभासबद्दल नाही, तर फॅन्सबद्दल बोलतोय. असं वागणं अजिबात योग्य नाही. हे तुमचं घर नाही. अशा वागणुकीमुळे प्रभासचंच नाव खराब होत आहे." तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, "अशा प्रकारांवर तात्काळ बंदी घालायला हवी. हे अत्यंत धोकादायक आहे आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो."
'द राजा साब' या सिनेमानं पहिल्याच दिवशी 63.3 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात प्रभाससोबत संजय दत्त, बोमन ईरानी, निधी अग्रवाल, मालविका मोहनन (तेलुगू सिनेमातील पदार्पण), रिद्धी कुमार आणि जरीना वहाब हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं, तर ही कथा राजा (प्रभास) आणि त्याची आजी गंगम्मा (जरीना वहाब) यांच्या नात्याभोवती फिरते. अल्झायमर आजाराशी झुंज देणारी गंगम्मा आपल्या बेपत्ता पती कनकराजू (संजय दत्त) यांना विसरू शकत नाही. आजीच्या या आशेच्या बळावर राजा आपल्या आजोबांचा शोध घेण्यासाठी एका प्रवासाला निघतो.
