TRENDING:

TRP Ratings: TRP लिस्टमधून 'अनुपमा' आणि 'तारक मेहता का'चा पत्ता कट, एकता कपूरने एक हाती मारली बाजी, TOP ला कोण?

Last Updated:

प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांची आवड- निवड दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. आता अशातच जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील टीआरपी रेटिंग काय आहे, जाणून घेऊयात...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
टीआरपी चार्टचे रेटिंग्स समोर आले आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांची आवड- निवड दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. आता अशातच जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील टीआरपी रेटिंग काय आहे, जाणून घेऊयात... एकता कपूरची नागिन मालिका प्रेक्षकांना कमालीची आवडती ठरली आहे. सध्या टीआरपी रेटिंग्समध्ये, एकता कपूरची 'नागिन 7' आणि स्मृती इराणी स्टारर 'क्योंकी साँस भी कभी बहु थी 2' या दोन्हीही मालिका नंबर 1 ला आहेत. या दोन्हीही मालिकांना प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय.
TRP Ratings: TRP लिस्टमधून 'अनुपमा' आणि 'तारक मेहता का'चा पत्ता कट, एकता कपूरने एक हाती मारली बाजी, TOP ला कोण?
TRP Ratings: TRP लिस्टमधून 'अनुपमा' आणि 'तारक मेहता का'चा पत्ता कट, एकता कपूरने एक हाती मारली बाजी, TOP ला कोण?
advertisement

गेल्या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ह्या मालिका आता सुरू आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आल्या आहेत. एकता कपूरच्या दोन्हीही मालिकांमध्ये रूपाली गांगुलीची अनुपमा सुद्धा पाहायला मिळत आहे. ती या आठवड्यात टॉप 3 वर आहे. 'नागिन ७' आणि 'क्यूंकी सास भी...' मधले कथानकातील ट्विस्ट्स प्रेक्षकांना भावत आहेत. तुलसी आणि नागिन टीव्हीवर परतल्यापासून, प्रेक्षक त्यांना आवडीने पाहत आहेत. तथापि, एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असलेली 'अनुपमा' आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असलेली दिसत आहे. 'अनुपमा'ची फॅन फोलोविंग आता घसरताना दिसते. पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत नंबर 1 वर येण्यासाठी 'अनुपमा' मालिकेचे प्रोड्युसर काय शक्कल लढवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

दरम्यान, एकेकाळी हिंदी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये चर्चेत राहणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. सर्वाधिक काळापासून सुरू असलेली ही मालिका आता प्रेक्षकांची नावडती होताना दिसत आहे. सतत मालिकेमध्ये येणारे ट्वीस्ट्स आणि सतत प्रेक्षकांना भुलवणं आता निर्मात्यांना महागात पडलं आहे. प्रेक्षकांनी मालिकेला नापसंद केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने या आठवड्यात देखील निराशाजनक कामगिरी केली आहे. गेल्या आठवड्यात हा शो 11 व्या क्रमांकावर होता, तो आता 12 व्या क्रमांकावर आला आहे. शोचा टीआरपी प्रत्येक आठवड्याला खाली घसरतोय. सध्या, मालिकेमध्ये पोपटलालच्या लग्नाचा ट्रॅक सुरु होता, यामुळे कदाचित टीआरपी वाढेल, अशी आशा होती, परंतु ही आशा सुद्धा निष्फळ ठरली. दुर्दैवाने, पोपटलालचे लग्न झाले नाही आणि शोचा टीआरपी वाढला नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
TRP Ratings: TRP लिस्टमधून 'अनुपमा' आणि 'तारक मेहता का'चा पत्ता कट, एकता कपूरने एक हाती मारली बाजी, TOP ला कोण?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल