वडापाव गर्लच्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चंद्रिका प्रचंड रडताना दिसत आहे. आपल्या पतीवर फसवणुकीचा आरोप करत ती म्हणाली, "दोन महिन्यांपासून मी हे सगळं सहन करतेय. जगाला काय दाखवायचं? आमचे भांडण? मी इथे दिवसभर काम करते, घर सांभाळते, मुलाला सांभाळते आणि तुम्ही हे उद्योग करताय? ही मुलगी तुमच्या मागेपुढे का फिरतेय? माझा पती, माझं प्रेम... आता माझं काय उरलंय?" केवळ आरोप करूनच चंद्रिका थांबली नाही, तर तिने पुराव्यादाखल पतीच्या चॅट्स आणि एका अनोळखी महिलेसोबतचे काही फोटोही कॅमेऱ्यासमोर दाखवले. "माझ्याकडे अजून बरेच पुरावे आहेत," असं म्हणत तिने पतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
advertisement
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
एकीकडे चंद्रिका आपलं दुःख मांडत असली, तरी नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. चंद्रिकाचा वादग्रस्त इतिहास पाहता, अनेकांना हा केवळ व्ह्यूव्हज मिळवण्यासाठी केलेला ड्रामा वाटत आहे. एक युजर म्हणाला, "वडापाव विकून प्रसिद्धी मिळवणं थांबलं, आता हे नवीन कंटेंट सुरू झालं का?" दुसऱ्याने टोला लगावला, "आता काम मिळत नाहीये, म्हणून वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडलाय." तिसरा युजर लिहितो, "हे सगळं खरं आहे की एखाद्या नवीन गाण्याचे किंवा शोचे प्रमोशन?"
चंद्रिका दीक्षितने 'बिग बॉस'मध्ये असतानाही आपल्या साध्या राहणीमानाचा आणि संघर्षाचा गवगवा केला होता. मात्र, आता थेट पतीवरच आरोप केल्यामुळे तिचं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे. हा व्हिडिओ खरोखरच तिच्या वैवाहिक जीवनावर आलेलं संकट आहे की हा एखाद्या स्क्रिप्टेड ड्राम्याचा भाग आहे, हे येणारा काळच सांगेल.
