TRENDING:

Ilaiyaraaja News: पद्म विभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान, सिनेसृष्टीतील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान

Last Updated:

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या 'अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे उद्घाटन आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: समकालीन काळात संगीतामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असून संगीत वेगवान झाले आहे. वाद्यासह तयार होणारे संगीत हे आपल्या कानापर्यंत पोहचते मात्र, भावनांसह निर्माण होणारे संगीत हे हृदयापर्यंत पोहचते असे प्रतिपादन पद्मविभूषण इलायाराजा यांनी यावेळी केले.
Ilaiyaraaja News: पद्म विभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान, सिनेसृष्टीतील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान
Ilaiyaraaja News: पद्म विभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान, सिनेसृष्टीतील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान
advertisement

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या 'अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यंदाचा पद्मपाणि पुरस्कार प्रसिद्ध आणि ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलायाराजा (राज्यसभा खासदार) यांना त्यांच्या भारतीय सिनेमा संगीतातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र आणि 2 लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी इलायाराजा यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

advertisement

यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजन रसूल पुक्कूट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन सी.एस.व्यंकटेश्वरन, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सचिन मुळे, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत आणि सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

advertisement

पुढे बोलताना इलायाराजा म्हणाले, मी कोणताही विचार न करता थेट संगीत लिहितो. आतापर्यंत 1545 चित्रपटांसाठी काम केले असून या प्रवासात 1545 दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी संगीत तयार करीत असताना काहीही नवीन तांत्रिक गोष्टी वापरत नाही. मी संगीतावर सातत्याने काम करत असून आजही संगीत शिकत आहे. आज सकाळीच माझ्या 1545 व्या चित्रपटासाठी संगीत तयार करून मी या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित राहिलो आहे. आज आपण पाहतो की, पियानोवर बोट ठेवलं की, संगीत तयार होत आहे. विशेषत: आज गावोगावी आणि घरोघरी संगीतकार आपल्याला पाहायला मिळतात. सराव, भावना आणि वाद्यापासून तयार होणारे संगीत सध्याच्या यांत्रिकतेच्या काळात मनाला भावणारे आहे. मला आज या ठिकाणी येऊन पद्मपाणि पुरस्कार स्वीकारत असताना मनापासून आनंद झाला आहे. या महोत्सवाला मी शुभेच्छा देतो, असे इलायाराजा म्हणाले.

advertisement

कुलपती अंकुशराव कदम अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने ‘हे विश्वची माझे घर’ या ब्रीद वाक्याला अनुसरून गेल्या दहा वर्षांत छत्रपती संभाजीनगर शहराला जागतिक सांस्कृतिक चळवळींशी सातत्याने जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलायाराजा यांना प्रदान करताना आम्हा सर्वांना मनापासून आनंद होत आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदीसह मराठी भाषेतही त्यांच्या संगीत रचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत 7000 हून अधिक गाणी आणि 1500 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती करणाऱ्या, भारतीय संगीताचा आत्मा असणार्‍या पद्म विभूषण इलायाराजा यांनी पद्मपाणि पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

advertisement

पद्मविभूषण इलायाराजा यांनी नऊ भाषांमध्ये सुमारे 7 हजारहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. चेन्नईहून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो. या महोत्सवाचे इतिहाशी एक वेगळे नाते असून महोत्सवात पद्मपाणि, सुवर्ण कैलास असे विविध इतिहासाची जोडणारे पुरस्कार दिले जातात. पुढच्या वर्षीपासून सुवर्ण शालीवाहन पुरस्कार मराठी चित्रपट स्पर्धेसाठी दिला जाणार आहे, असे संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले. ऑस्कर विजेते ध्वनी संयोजनकार रसूल पुक्कुट्टी यावेळी बोलताना म्हणाले, पद्मविभूषण इलायाराजा हे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ, अतिशय दयाळू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. आम्हांला त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात असं मंदिर तुम्ही पाहिलं नसेल! पर्यटकांचं ठरतंय नवं आकर्षण, हे आहे लोकेशन
सर्व पहा

या महोत्सवात एकूण 70 चित्रपट दाखविण्यात येणार असून हे माझे महोत्सवात कार्य करण्याचे दुसरे वर्ष आहे. विविध प्रकारच्या चित्रपट स्पर्धा या महोत्सवात आयोजित करण्यात आल्या असल्याचे दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी यावेळी सांगितले. सभागृहात उपस्थित असलेल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर पद्मविभूषण इलायाराजा यांनी ‘जननी जननी...’ हे गाणे गायले. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगरची अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिव कदम यांनी केले. अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दु:खद निधानबद्दल शोक संदेश व्यक्त केला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करीत श्रद्धांजली अर्पण केली. हा उद्घाटन सोहळा अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला होता.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Ilaiyaraaja News: पद्म विभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान, सिनेसृष्टीतील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल