छावा या सिनेमातील विक्की कौशलचा पहिला लुक समोर आला तेव्हापासूनच सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. टीझरमध्ये विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत हजारो दुष्मनांशी लढाई करताना दिसत आहे. छावाच्या टीझरबरोबरच सिनेमाची रिलीज डेट देखील घोषित करण्यात आली आहे.
( कोण आहे बोनी कपूरची 'जान'? जिच्यामुळे 68व्या वर्षी कमी केलं तब्बल 14 किलो वजन )
advertisement
छावा सिनेमात ऐतिहासिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपूत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षकथा, त्यांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे. विक्की कौशलबरोबरच या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, मराठी अभिनेता संतोष जुवेकरही महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
अभिनेता विक्की कौशल छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भुमिकेत आहेत. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाईंच्या भुमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. मिमी, लुका छुपी, जरा हटके जरा बचके सारखे कॉमेडी आणि रोमान्स असलेले सिनेमे केल्यानंतर छावा सारखा ऐतिहासिक सिनेमा त्यांनी केला आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी छावा सिनेमा रिलीज होणार आहे.
