कतरिना लवकरच आई होणार?
कतरिनाचा हा बेबी बंप दिसणारा फोटो रेडिटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या फोटोत कतरिना एका शूटमध्ये दिसत आहे आणि तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या फोटोवर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. एक चाहता म्हणाला, “मी कतरिनासाठी खूप खुश आहे.” तर दुसरा म्हणाला, “खूप-खूप अभिनंदन, मी खूप आनंदी आहे.”
advertisement
याआधीही कतरिना आणि विकी यांना एकत्र पाहिलं गेलं होतं, तेव्हाही कतरिना लूज कपड्यांमध्ये होती, ज्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
काही महिन्यांपासून कतरिना गायब
गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमात दिसलेली नाही, ज्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. नुकतंच आर्यन खानच्या वेब सिरीजच्या प्रीमियरलाही कतरिना उपस्थित नव्हती. विकी कौशल एकटाच दिसला होता, ज्यामुळे अनेकांनी प्रश्न विचारले होते.
Omg omg omg… Katrina’s expecting 🥺💗🥺💗🥺💗 pic.twitter.com/b25DTPGHF1
—