या व्हिडीओमध्ये या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सरसर भल्यामोठ्या झाडावर चढताना दिसतोय. पण त्याच्या अंगावर एकही कपडा नाहीये. नग्न अवस्थेत तो झाडावर चढला आहे. त्याने त्याचा नग्न अवस्थेत झाडावर चढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याआधी भलीमोठी पोस्टही लिहिली आहे. अभिनेता अशा अवस्थेत झाडावर का चढला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यानं असं करण्यामागचं कारणही सांगितलं.
advertisement
( पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचा डंका, या 10 फिल्म करतायत ट्रेंड, तुम्ही कोणती पाहिली? )
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच विद्युत जामवाला. आपल्या दमदार अॅक्शन, जबरदस्त फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. मात्र यावेळी त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांना अक्षरशः धक्का बसला आहे. विद्युत कोणतेही कपडे न घालता झाडावर चढताना दिसतो. हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये विद्युत जामवालनं असं कारण्यामागचं कारणही स्पष्ट केलं. तो म्हणला, "कलारीपयट्टूचा साधक म्हणून मी दरवर्षी एकदा 'सहज' या योगिक साधनेत स्वतःला झोकून देतो. 'सहज' म्हणजे नैसर्गिक सहजतेच्या आणि स्वाभाविक प्रवृत्तीच्या अवस्थेत परत जाणं. ज्यामुळे निसर्गाशी आणि अंतर्मनाशी अधिक खोल नातं जुळतं."
त्याने पुढे लिहिलंय, "शास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर ही साधना शरीरातील अनेक न्यूरोरेसेप्टर्स आणि प्रोप्रीओसेप्टर्स सक्रिय करते. त्यामुळे संवेदनांची जाणीव अधिक तीव्र होते, संतुलन आणि समन्वय सुधारतो. यामुळे शरीराची जागरूकता वाढते, मानसिक एकाग्रता तीव्र होते आणि जमिनीशी घट्ट जोडलेपणाची खोल भावना निर्माण होते."
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी विद्युतच्या निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीचं आणि फिटनेसबाबत त्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र सोशल प्लॅटफॉर्मवर अशा स्वरूपाचा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
