बॅालिवूड मध्ये मित्रता आणि दुश्मनी याच्या चर्चा खूपच चालू असतात. सलमानच्या चर्चा सर्वाधिक झाल्यात. जया बच्चन यांचे खास मित्र. शिस्तबद्ध अभिनेते खलनायक डैनी डेन्जोंगपा. सलमान आणि डैनी यांच्यात काही मतभेद होते. ते मतभेद इतके टोकाला गेले होते की त्या दोघांनी तब्बव 23 वर्ष एकत्र काम केले नाही. यांच्यात कटूता निर्माण झाली होती.
advertisement
1991 मध्ये सलमान आणि डॅनी यांनी एकत्र काम केले होते. त्या सिनेमात डॅनींनी सलमालच्या वडीलांची भूमिका केली होती. त्या सिनेमा दरम्यान दोघांमध्ये मतभेद झाले. या सिनेमाच्या सेटवर सलमान कायम उशीरा यायचा. यावर सावन कुमार त्याच्यावर नाराज होते आणि त्यानंतर डॅनी यांनी सलमानशी पंगा घेतला. त्याकाळात डॅनींचा दबदबा असायचा आणि सलमान इंडस्ट्री मध्ये नवखा होता. त्यांच्या दोघांच्या या मतभेदानंतर त्यांनी 23 वर्ष एकत्र काम नाही केले. डॅनी हे सलमान लीड असलेल्या सिनेमाला नकार द्यायचे.
अचानक सलमान वरील राग डैनींचा शांत झाला
2014 च्या एका मुलाखतीत डॅनी सलमान विषयी म्हणाले, "सलमान डाउन टू अर्थ माणूस आहे. त्याला पाहिल्यावर समजतो की, तो नेमकं काय विचार करतो. त्याला कोण आवडत नसेल तर त्याच्या डोळ्यात ते दिसते. तो जे कोही बोलतो ते थेट बोलतो. तो आज मोठा स्टार आहे. तो खरा हीरो आहे. तो 1980 मधील अमिताभ बच्चन आहे .एक पासून दहा नंबर पर्यंत तोच आहे. तो लोकांचा हीरो आहे."
2014 नंतर सलमान आणि डॅनी हे पुन्हा एकदा 'जय हो' सिनेमात एकत्र दिसले. डॅनी यात खलनायक होते. ते शूटींगलाही एकदम प्रोफेशनल राहायचे.