TRENDING:

कुवेतमध्ये अडकलेला मुलगा भारतात परतला, एअरपोर्टवर अभिनेत्री विशाखा सुभेदारला अश्रू अनावर

Last Updated:

कुवेतमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे विशाखा सुभेदार हिचा मुलगा कुवेतमध्ये अडकला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने तो सुखरूप भारतात परतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा मुलगा कुवेतमध्ये अडकला होता. जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तो तिथे अडकला होता. विशाखाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिने मुलाला भारतात आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर शिंदे यांच्या मदतीने विशाखाचा मुलगा अखेर सुखरूप भारतात परतला आहे.
News18
News18
advertisement

विशाखा तिच्या मुलाला आणण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर पोहोचली. मुलाला सुखरूप आलेलं पाहून विशाखाचा अश्रूंचा बांध फुटला. तिने धावत जाऊन मुलाला मिठी मारली. त्याच्या गळ्यात पडून रडली. तो भारतात सुखरूप आल्याचं पाहून तिला अश्रू अनावर झाले. तिने मुलावर प्रेम व्यक्त करत त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्या लोकांचंही भारतात स्वागत केलं.

( Usha Nadkarni : नवऱ्यापासून वेगळं आयुष्य, पण आडनाव मात्र तेच; पहिल्यांदाच बोलल्या उषा नाडकर्णी )

advertisement

अभिनय हे कुवेतमार्गे लंडनला निघाले होते. कुवेत येथे त्यांचा ट्रान्झिट थांबा होता. याच दरम्यान इराणने कुवेतवर ड्रोन व मिसाईल हल्ले सुरू केल्याने कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणे रद्द केली. त्यामुळे अभिनय व त्यांच्यासह अन्य मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे लंडनला जाणे किंवा मायदेशी परतणे यातील कोणतीच शक्यता दृष्टिक्षेपात नसताना युद्धाचीही झळ सोसण्याची भीती निर्माण झाली. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्याने जीवाचा प्रश्न निर्माण झाला.

advertisement

कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार व अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) येथून भारतात परत आणण्याचे नियोजन झाले. मात्र अभिनय सुभेदार यांच्यासह अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गती मिळाली आणि अभिनय यांच्यासह अन्य 30 महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे ७०० किलोमीटर अंतराचा दहा तास प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

यानंतर रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइटद्वारे त्यांच्या परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला. यानुसार दिनांक 9 मार्च रोजी रियाधहून हे विमान रात्री 8:40 वाजता (रियाध वेळ) / रात्री 11:10 वाजता (भारतीय वेळ) प्रस्थान करणार असून 10 मार्चच्या मध्यरात्री 3 वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या विमानातून अभिनय सुभेदार यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
कुवेतमध्ये अडकलेला मुलगा भारतात परतला, एअरपोर्टवर अभिनेत्री विशाखा सुभेदारला अश्रू अनावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल