गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज होऊन अवघे दोन तास झाले नाहीत, तोच त्याने ३० लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. टीझरची सुरुवात एका स्मशानभूमीच्या दृश्याने होते, जिथे माफिया टोळी कोणाच्या तरी मृत्यूचा शोक साजरी करत असते. अचानक तिथे एक आलिशान कार येते आणि वातावरण बदलतं.
Toxic च्या टीझरमध्ये काय आहे?
advertisement
टीझरच्या सुरूवातीलाच काही इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत, ज्यामुळे या फिल्ममध्ये बोल्डनेसचा भरभरून वापर केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर कारमधून बाहेर पडणारा तो रांगडा अवतार, लांब दाढी, हातात जळत असलेली सिगार, ओव्हरसाईज कोट आणि खांद्यावर मोठी बंदूक घेतलेला यश जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा एकच रोमांच उभा राहतो. यात त्याच्या पात्राचं नाव 'राया' असल्याचं समजतंय, जो माफिया वर्ल्डचा खरा मास्टरमाइंड आहे.
टीझरच्या शेवटी यश जेव्हा अत्यंत शांत स्वरात "डॅडी इज होम" हा डायलॉग बोलतो, तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो. हा केवळ संवाद नाही, तर यशने चित्रपटसृष्टीला दिलेला इशारा आहे की, बॉक्स ऑफिसचा खरा राजा परतला आहे. हा टीझर इतका प्रॉमिसिंग आहे की, त्याने एका झटक्यात 'धुरंधर २' सारख्या मोठ्या चित्रपटाला मोठा शॉक दिला आहे.
19 मार्चला होणार जबरदस्त मूव्ही क्लॅश
येत्या १९ मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर 'सुनामी' येणार आहे. कारण याच दिवशी यशचा 'टॉक्सिक' आणि रणवीर सिंहचा 'धुरंधर २' समोरासमोर उभे ठाकणार आहेत. 'टॉक्सिक' कन्नडसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा ५ भाषांत रिलीज होणार. 'धुरंधर'च्या अफाट यशानंतर मेकर्सनी हा भागही पॅन-इंडिया ५ भाषांत रिलीज करण्याची घोषणा केली आहे. एकीकडे रॉकी भाईची जबरदस्त फॅन फॉलोईंग आणि दुसरीकडे 'धुरंधर'ची क्रेझ! या दोन दिग्गजांच्या लढाईत कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणं आता रंजक ठरेल.
