ओपन शर्ट अन् जबरदस्त कॉन्फिडन्स
नुकतंच सोनम कपूरला मुंबईत एका आउटिंग दरम्यान कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. यावेळी सोनमने नेहमीप्रमाणे आपल्या फॅशन सेन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिने चक्क ओपन शर्ट स्टाईल आउटफिट घालून बिनधास्त आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला. सोनमच्या चेहऱ्यावरचा तो प्रेग्नेंसी ग्लो आणि तिचा आत्मविश्वास पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. फॅशन म्हणजे केवळ कपडे नसून तो एक अॅटिट्यूड आहे, हे सोनमने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
सोनम कपूरच्या घरी येणार जुळं
सोनमचा हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला. सोनमचा बेबी बंप पाहून चाहत्यांनी एक तर्क लावायला सुरुवात केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर विचारलंय की, सोनम जुळ्या मुलांना जन्म देणार आहे का? तिचा बेबी बंप बराच मोठा दिसत असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. अर्थात, सोनम किंवा आहुजा कुटुंबाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण चाहत्यांच्या कयासामुळे मात्र इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
मार्च २०२६ मध्ये येणार चिमुकला पाहुणा
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम कपूर सध्या सहा महिन्यांची प्रेग्नंट असून मार्च २०२६ च्या आसपास ती आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकते. २०२० मध्ये वायूच्या जन्मानंतर आता कपूर आणि आहुजा कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. प्रेग्नेंसीच्या या शेवटच्या टप्प्यातही सोनमचं स्टाईल गेम ऑन पॉईंट आहे. ती ज्या पद्धतीने स्वतःला कॅरी करत आहे, त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.
