TRENDING:

Guess Who : IAS अधिकारी होण्याचं स्वप्न, मग शेती करण्याचा घेतला निर्णय; आज गाजवतेय बॉलिवूड

Last Updated:

Bollywood Actress : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेलताय. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तर IAS अधिकारी सोडून देशाची सेवा करायची होती. पुढे तिने शेती करण्याचाही विचार केला. पण नंतर ते सर्वसोडून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bollywood Actress : बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत नशीब आजमावण्यासाठी खेड्यापाड्यांतून अनेक कलाकार घर, कुटुंब आणि नोकरी सोडून मुंबईत येतात. त्यापैकी काही जण लगेचच यशाच्या शिखरावर पोहोचतात. तर काहींना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. बॉलिवूडच्या अशाच एका अभिनेत्रीने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीने एकेकाळी IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. IAS अधिकारी होऊन देशसेवा करण्याची तिची इच्छा होती. त्यानंतर शेती करण्याचाही तिने विचार केला होता. पण नंतर मात्र तिने बॉलिवूडमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
News18
News18
advertisement

IAS अधिकारी होण्याची इच्छा असणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव यामी गौतम आहे. यामी गौतमचा जन्म 28 नोव्हेंबर 1998 रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर याठिकाणी झाला. तर तिचे बालपण चंदीगडमध्ये गेलं. यामी गौतम आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी एकेकाळी मात्र IAS अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यामुळे तिने वकिलीत शिक्षण पूर्ण केलं. पण वडिलांच्या सांगण्यावरुन तिने अभिनयाची वाट निवडली.

advertisement

एका जाहिरातीने बदललं आयुष्य

यामी गौतमने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्ये तिने काम केलं. 'चांद के पार चलो' ही तिची पहिली मालिका होती. पण या मालिकेच्या माध्यमातून तिला विशेष ओळख मिळाली नाही. मालिका करत असताना तिला एका फेअरनेस क्रीमरची जाहिरात मिळाली आणि यामी गौतम रातोरात सुपरस्टार झाली. छोटा पडदा, जाहिरात विश्व गाजवल्यानंतर तिला रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.

advertisement

'ही' होती यामी गौतमची पहिली फिल्म

यामी गौतमने 'विक्की डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होते. 'विक्की डोनर' हा 2012 मध्ये रिलीज झालेला चित्रपट सुपरहिट ठरला आणि यामी गौतमला आणखी प्रसिद्धी मिळाली. यामी गौतम त्यानंतर सनम रे, बदलापूर, टोटल स्यापा, लॉस्ट, हीरो, अॅक्शन जॅक्सन, जुनूनियत, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, बाला, दसवीं, अ थर्सडे आणि ओएमजी 2 अशा अनेक चित्रपटांत झळकली.

advertisement

यामी गौतम झालेली त्रस्त

रणवीर अल्लाहबादियासोबत बोलताना यामी गौतमने एक किस्सा शेअर केला होता. यामी गौतम म्हणालेली,"हे शहर तुमची परीक्षा घेतं. कधी कधी तुम्हाला त्याच्यापासून तोडून टाकतं. माझ्या आयुष्यातही एक असा काळ आला होता की मला हे सगळं सोडून हिमाचल प्रदेशात परत जायचं होतं. तिथे जाऊन शेती करावी असा विचार मनात आला होता. 'विक्की डोनर'च्या यशानंतर 2018-2019 मध्ये माझ्या करिअरमध्ये खूपच लो फेज आला होता. त्यामुळे मी आईला सांगितलं होतं की जर माझा पुढचा चित्रपट चालला नाही तर मी घरी परत येईन. मला अभिनय आवडतो. पण हा प्रवास खूप अवघड असतो. मला हे समजत नव्हतं की नेहमी लोकांना का सिद्ध करावं लागतं की तुम्ही चांगले कलाकार आहात?".

advertisement

यामी गौतम-आदित्य धरची लव्हस्टोरी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

यामी गौतम नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिने 4 जून 2021 रोजी अतिशय साध्या पद्धतीने दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत लग्न केलं. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या सेटवर यामी आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. पण त्यांनी त्यांचं रिलेशन जगजाहीर केलं नव्हतं. 4 जून 2021 रोजी लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : IAS अधिकारी होण्याचं स्वप्न, मग शेती करण्याचा घेतला निर्णय; आज गाजवतेय बॉलिवूड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल