मणी मेराज हा बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या साहेबगंज ब्लॉकचा रहिवासी आहे. तो सोशल मीडियावर आपल्या विनोदी व्हिडिओंसाठी ओळखला जातो. लाखो लोक त्याचे व्हिडिओ पाहतात. अलीकडेच त्याने एका अभिनेत्रीबरोबर भोजपुरी चित्रपटातही काम केले होते. पण हाच ग्लॅमर आता त्याच्या पतनाचं कारण ठरला.
'तू मरणार आहेस?' सैफ अली खानने सांगितलं असं काही.... काजोल मिठी मारुन लागली रडायला
advertisement
या प्रकरणाची सुरुवात त्याच्या एका सहअभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे झाली. तिने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मणी मेराजवर बलात्कार, फसवणूक आणि धर्मांतराचा दबाव आणल्याचा आरोप केला होता. या अभिनेत्रीने सांगितलं, "मणीने मला अविवाहित असल्याचं सांगितलं, पण तो आधीच विवाहित होता. त्याने मला कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर माझ्यावर अत्याचार केला."
त्याचबरोबर, तिने असा आरोपही केला की मणीने तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि गोमांस खाण्यासाठी दबाव आणला. महिलेने पोलिसांना सांगितले की मेराजने तिच्याकडून लाखो रुपये उकळले, तिच्यावर वारंवार अत्याचार केला, आणि जेव्हा ती विरोध करत होती, तेव्हा त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला जीव देण्याची धमकी दिली.
मणी मेराज गेल्या काही दिवसांपासून पाटण्यातील अनिसाबाद परिसरात लपून बसला होता. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी आखलेल्या कारवाईत त्याला पकडण्यात यश आलं. तो आपल्या मित्राच्या फ्लॅटमधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याला घेराव घालून अटक केली. त्यानंतर पाटणा न्यायालयातून ट्रान्झिट रिमांडवर त्याला उत्तर प्रदेशात नेण्यात आलं आहे.