ऐन निवडणुकीच्यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीमुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. तर भाजपवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. सँकेलिममध्ये पालखी उत्सवादरम्यान दोन गट आमनेसामने आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली जात आहे. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी त्यांच्यामुळे स्थिती बिघडली असा आरोप एका गटाने केला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सँकेलिम हा गड मानला जातो. याच मतदारसंघातच हा प्रकार घडल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी नाराजी आहे. शिवाय विरोधकांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
advertisement
गोव्याचे आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. एवढा मोठा राडा होत असताना पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते? पोलिसांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे वादावादी झाल्याचा आरोप अमित पालेकर यांनी केला.
गोव्याच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील कावथंकर यांनीही सरकारवर टीका केली. एवढी मोठी सुरक्षा असूनही दोन गटात वाद होणं हे दुर्देवी. लोकसभा निवडणुका सुरू असताना असे प्रकार राज्यात घडायला नको. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असं सुनील कावथंकर यांनी म्हटलं.