राज्यात 'सर्वांसाठी घरे' संकल्पना
केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0' ची घोषणा केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र शासनानेही 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक खास वेब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर इच्छुक लाभार्थींनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात पती-पत्नी आणि अविवाहित मुले/मुली (वय 18 वर्षांखालील) यांचा समावेश असणार आहे.
advertisement
योजनेसाठी महत्त्वाचे निकष (Criteria)
- घराची अट : योजनेखाली अनुदान किंवा मदत मिळवण्यासाठी शहरी भागातील कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशाच्या कुठल्याही भागात घर नसावे.
- उत्पन्नाची अट : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांहून कमी असावे.
- पूर्वीच्या योजनेचा लाभ : लाभार्थीने मागील 20 वर्षांत कोणत्याही शासकीय आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- घराची मालकी : योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावावर असतील. त्या कुटुंबात कर्ता सदस्य नसेल, तर घर कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या नावावर राहील.
चिपळूण नगरपरिषदेने सुरू केलेल्या या स्वतंत्र कक्षामुळे नागरिकांना योजनेची माहिती मिळवणे आणि अर्ज करणे सोपे होणार आहे. असे असले तरी नागरिकांना कोणत्याही एजंट किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. घर मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केली त्वरित योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांना माहिती द्या. संबंधित व्यक्तीवर त्वरित कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
हे ही वाचा : सेवा केंद्र की पिळवणूक केंद्र? 'या' महा-ई-सेवा केंद्रांना ठोकणार ताळे, आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!
हे ही वाचा : ‘लाडकी बहिण’ योजनेतील मोठा घोळ, 50,000 हून अधिक लाडक्या बहिणी अपात्र, तुमचं नाव तर वगळलं नाही?