TRENDING:

गणपती म्हणून पीरियड्स पुढे ढकलण्याची गोळी घेताय, सावधान! 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Last Updated:

Menstrual period pills cause death : आजही धार्मिक कार्य किंवा शुभकार्यात, कार्यक्रमात महिला मासिक पाळी आली तर जात नाहीत. त्या कालावधीत मासिक पाळी येणार असेल तर ती पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कोणताही सण म्हटला की महिलांना सगळ्यात आधी टेन्शन येतं ते पीरियड्स म्हणजे मासिक पाळीचं. आजही धार्मिक कार्य किंवा शुभकार्यात, कार्यक्रमात महिला मासिक पाळी आली तर जात नाहीत. त्या कालावधीत मासिक पाळी येणार असेल तर ती पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. आता गणेशोत्सव तोंडावर आहे. त्यामुळे कितीतरी महिला अशा गोळ्या घेत असतील. तुम्हीही अशा गोळ्या घेत असाल तर सावधान. कारण यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

14 ऑगस्ट रोजी रिबूटिंग द ब्रेन पॉडकास्टच्या भागात व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. विवेकानंद यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की एक 18 वर्षांची मुलगी त्यांच्या क्लिनिकमध्ये आली होती. तिचे पालक नाही तर तिची मैत्रीण सोबत होती. तिने आपले पाय दुखत असल्याचं सांगितलं. तिचे पाय सूजले होते. मांडीतही वेदना होत होत्या.

advertisement

ही इनरवेअर घालताच तरुणीची भयानक अवस्था, पोहोचली रुग्णालयात, तुम्ही तर घेतली नाहीये ना?

तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस झाल्याचं निदान झालं. डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. जिथं खोल नसांमध्ये विशेषत: पायांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते.  रक्ताची गुठळी जवळजळ नाभीच्या पातळीपर्यंत होती जी सामान्य इलियाक नस आहे.

advertisement

मुलीने पूजा असल्याने मासिक पाळी थांबवण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेतल्याचं सांगितलं. 3 दिवस तिने गोळ्या घेतल्या. धार्मिक समारंभासाठी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी तिने हार्मोनल गोळ्या घेतल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली.. तिला रुग्णालयात दाखल करायला सांगितलं. पण तिची आई नाही म्हणत असल्याचं सांगून तिच्या वडिलांनी तेव्हा अॅडमिट केलं नाही, सकाळी अॅडमिट करतो असं ते म्हणाले. पण मध्यरात्रीच तिची प्रकृती बिघडली. तिला रात्री 2 वाजता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. तिला श्वास घेता येत नव्हता. तिचा मृत्यू झाला.

advertisement

'पोटात उंदीर घुसला', 14 वर्षीय मुलीसोबत घडला नको तो प्रकार

बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल मेंगडे यांनी लोकल18ला मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांच्या दुष्परिणामांबाबत अधिक माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, क्वचित प्रसंगी पाळी लांब होण्याच्या गोळीचे सेवन करणे ठीक आहे. वर्षातून एक किंवा दोन वेळेस असे झाले तरी चालेल. मात्र तुम्ही मासिक पाळी लांबवण्यासाठी दर वेळेस गोळ्या घेत असाल तर याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. यामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव होणे, यकृतावर सूज येणे, रक्तामध्ये गाठी तयार होणं या प्रकारचे दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेणं हे धोकादायक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गणपती म्हणून पीरियड्स पुढे ढकलण्याची गोळी घेताय, सावधान! 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल