ही इनरवेअर घालताच तरुणीची भयानक अवस्था, पोहोचली रुग्णालयात, तुम्ही तर घेतली नाहीये ना?

Last Updated:

Innerwear : तरुणीने ऑनलाईन विचित्र इनरवेअर खरेदी केली. ती घातल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिने एक व्हिडिओ शेअर केला आणि तिची वेदनादायक कहाणी सांगितली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म अशा बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत ज्या बाजारात मिळत नाही. काही गोष्टी इतक्या विचित्र असतात की आपण विचारही केला नसेल. अशीच एक विचित्र इनरवेअर जी एका महिलेने ऑनलाईन खरेदी केली. पण ती घातल्यानंतर तिची अवस्था इतकी भयानक झाली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
मॉली मे वॉटसन असं या महिलेचं नाव आहे. 27 वर्षांची मॉली ब्रिटनमध्ये राहते. तिने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आणि तिची वेदनादायक कहाणी सांगितली आहे. मॉलीने सांगितलं की तिने मे 2024 मध्ये तिच्या बहिणीच्या बेबी शॉवरमध्ये घालण्यासाठी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ऑनलाइन दुकानातून शेपवेअर खरेदी केलं होतं. हे शॉर्ट्स स्पॅन्क्ससारखं होतं. त्याची किंमत फक्त 8.57 युरो म्हणजेच 1 हजार रुपये होती. मॉलीला वाटलं की तिला खूप मोठी डील मिळाली आहे, पण तिला हेही कळलं नव्हतं की ही स्वस्त डील तिच्या आयुष्यातील सर्वात महागडी चूक ठरेल.
advertisement
27 जुलै 2024 रोजी बेबी शॉवरला मॉलीने पहिल्यांदाच तिच्या ड्रेसखाली हे इनरवेअर घातलं. बेबी शॉवर कार्यक्रमादरम्यान तिला अचानक तिच्या उजव्या मांडी आणि कंबरेजवळ जळजळायला लागलं. ते इतकं असह्य होतं की क्षणभर तिला वाटलं की तिच्या ड्रेसमध्ये मधमाशी घुसली आहे. नेमकं काय झालं म्हणून पाहण्यासाठी ती लगेच बाथरूममध्ये गेली. तिने जे पाहिलं ते धक्कादायक होतं.  तिच्या शेपवेअरमधील लवचिक इलास्टेन मटेरियल वितळलं होतं आणि तिच्या त्वचेला चिकटलं होतं.
advertisement
तिने लगेच लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये गेली. रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं की जखमा इतक्या खोल आहेत की तिच्या त्वचेवर आयुष्यभर जखमा राहू शकतात. तिला ताबडतोब मलमपट्टी करण्यात आली आणि उपचार सुरू करण्यात आले. हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर तिने संबंधित कंपनीच्या सोशल मीडियावर इनरवेअरचे फोटो पोस्ट करत याबाबत तक्रार केली. कंपनीने तिला फक्त 10 युरो म्हणजे सुमारे 1200 रुपयांचं कूपन आणि परतफेड देऊ केली.
advertisement
मॉलीने जेव्हा हे तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं तेव्हा अनेकांनी सांगितलं की त्यांनीही असेच स्वस्त कपडे ऑनलाइन खरेदी केले होते आणि त्यांनाही त्वचेवर खाज सुटत होती आणि जळजळ होत होती. मॉलीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा तो काही क्षणातच व्हायरल झाला. तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी जूनमध्येच त्या विक्रेत्याला आणि त्याच्या उत्पादनांना प्लॅटफॉर्मवरून काढून टाकलं. पण तरी ऑनलाईन उत्पादनं किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उद्भवतोच.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ही इनरवेअर घालताच तरुणीची भयानक अवस्था, पोहोचली रुग्णालयात, तुम्ही तर घेतली नाहीये ना?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement