TRENDING:

Condom : म्युझियममध्ये ठेवलंय कंडोम, पाहण्यासाठी गर्दी, यात काय खास आहे?

Last Updated:

Condom in museum : हा कंडोम नोव्हेंबर 2022 मध्ये हार्लेम इथं झालेल्या लिलावात 1000 युरो म्हणजे जवळपास एक लाख रुपये किमतीला खरेदी करण्यात आला होता. तो रिजम्युझियममधील एका छोट्या प्रदर्शनात प्रदर्शित केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कंडोम, सुरक्षित शारीरिक संबंध आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्याचा एक उपाय. काही लोकांना तर दुकानातून कंडोम हवं असं मागतानाही लाज वाटते. असं असताना एक कंडोम चक्क म्युझियममध्ये प्रदर्शनाला ठेवण्यात आलं आहे आणि ते पाहायलासुद्धा गर्दी झाली आहे. असं या कंडोममध्ये काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
News18
News18
advertisement

नेदरलँड्सचं नॅशनल म्युझियम रिजक्सम्युझियममध्ये अलीकडेच त्यांच्या प्रदर्शनात एक अनोखी आणि ऐतिहासिक वस्तू समाविष्ट केली आहे, जी कला आणि अॅमस्टरडॅमच्या प्रसिद्ध रेड लाईट डिस्ट्रिक्टमधील एक अनोखा संबंध दर्शवते. ही वस्तू सुमारे 200 वर्षे जुनी कंडोम आहे.

असोसिएटेड प्रेस आणि द गार्डियनच्या वृत्तानुसार, हा कंडोम 20 सेमी लांब आहे, तो बनवण्यासाठी मेंढ्यांच्या अपेंडिक्सचा वापर करण्यात आला होता. अतिनील प्रकाशातून तपासल्यावर असं दिसून येतं की तो कधीही वापरला गेला नाही. हा कंडोम नोव्हेंबर 2022 मध्ये हार्लेम इथं झालेल्या लिलावात 1000 युरो म्हणजे जवळपास एक लाख रुपये किमतीला खरेदी करण्यात आला होता. तो रीजम्युझियममधील एका छोट्या प्रदर्शनात प्रदर्शित केला जात आहे.

advertisement

कंडोममध्ये काय खास आहे?

कंडोमवर 19 व्या शतकातील सेक्स वर्कर्स आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित डच आणि फ्रेंच प्रिंट आणि चित्रे आहेत.  या कंडोमवर कामुक चित्रं काढली गेली आहेत जी 1830 च्या दशकात बनवली गेली असल्याचा अंदाज आहे. हा कंडोम कदाचित एखाद्या वेश्यालयाशी संबंधित लक्झरी स्मरणिका म्हणून बनवला गेला असावा.

Shilajit : पुरुषांची मर्दांनगी वाढवणारं शिलाजीत महिलाही खाऊ शकतात का? खाल्लं तर काय होईल?

advertisement

रीसम्युजियमच्या क्युरेटर जॉयस झेलेन यांच्या मते, या कंडोमवर कोरलेल्या चित्रात अर्धवस्त्र असलेल्या ननचे कामुक चित्र आणि तीन पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट आहेत. यासोबतच फ्रेंचमध्ये लिहिलं आहे, "व्होइला, मोन चोइक्स"  म्हणजेच "ही माझी निवड आहे. हे चित्र 'द जजमेंट ऑफ पॅरिस' या जुन्या चित्राचा संदर्भ देतं.

हा कंडोम लैंगिक आरोग्याचे विनोद आणि गांभीर्य दोन्ही दर्शवितो. 1830 च्या दशकात जेव्हा ते तयार केले गेले तेव्हा कंडोमचा वापर नकारात्मक गोष्टी म्हणून पाहिला जात असे, कंडोम प्रामुख्याने वेश्यालयांमध्ये किंवा न्हावीच्या दुकानांमध्ये विकले जात होते आणि लक्झरी दुकानांमध्ये विशेष कस्टम-मेड कंडोम दिल्याच्या काही बातम्या आहेत.

advertisement

लग्न कराल तर जास्त जगाल! संशोधन सांगतंय लग्न केल्याने वाढतं वय, पण कसं काय?

त्या वेळी कंडोम सहसा लिनेन, प्राण्यांची कातडी किंवा कासवाच्या कवचापासून बनवले जात होते आणि सिफिलीससारख्या लैंगिक संक्रमित रोगांपासून संरक्षण करण्यात ते मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरलं. 1839 मध्ये व्हल्कनाइज्ड रबरचा शोध लागल्यानंतरच कंडोम अधिक सुरक्षित आणि सुलभ झाले.

advertisement

नेदरलँड्सच्या राष्ट्रीय संग्रहालयाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात लैंगिक आरोग्याशी संबंधित विषय शतकानुशतके मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग कसे आहेत आणि कलेच्या माध्यमातून ते समजून घेणं आजही कसे महत्त्वाचे आहे हे दाखवलं आहे. हे प्रदर्शन या महिन्याच्या अखेरीपर्यंत चालेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Condom : म्युझियममध्ये ठेवलंय कंडोम, पाहण्यासाठी गर्दी, यात काय खास आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल