टाइप 2 डायबेटिज नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली लाईफस्टाईल आणि सकस आहार गरजेचा आहे. तुम्हाला अशा 3 मसाल्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन डायबेटिज नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. आहारतज्ञ आणि लेखिका कविता देवगन यांनी किचनमधील काही मसाले डायबेटिज नियंत्रणासाठी चांगले ठरतात असे सांगितले आहे.
दालचिनी : जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. यात असे कंपाउंड्स असतात जे इंसुलिन रिजिस्टेंस आणि सूज कमी करण्यास मदत करते. तेव्हा तुम्ही चहा, दलिया, फोडणी इत्यादींमध्ये दालचिनीचा वापर करू शकता. जेवण करताना जवळपास प्रत्येक पदार्थ बनवताना तुम्ही त्यात दालचिनी टाकू शकता.
advertisement
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातांवर दिसतात 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
काळी मिरी : काळीमिरीमध्ये पिपेरिन नावाचा कंपाउंड असतो जो इंसुलिनचा प्रभाव सुधारण्यास मदत करतो आणि ब्लड शुगर लेव्हल देखील कमी करण्यास उपयोगी ठरतो. काळीमिरीचा वापर तुम्ही रस्साभाजीत, सूप, चहा, सॉस इत्यादीमध्ये करून त्याचे सेवन करू शकता.
मेथीचे दाणे : मेथीचे दाणे डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे सीरम कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइड्सला देखील कमी करण्यास मदत करते. तुम्ही मेथीचे दाणे विविध पदार्थांमध्ये वापरू शकता. किंवा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने डायबेटिज नियंत्रणात येण्यास मदत होते.
(सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा डायबेटिजच्या रुग्णांनी आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)