41 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठी घटना घडली. त्यावेळी पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर बदल दिसून आले. पृथ्वीचा उत्तर ध्रुव दर काही वर्षांनी फिरतो आणि हे आतापर्यंत 180 वेळा घडलं आहे. 41 हजार वर्षांपूर्वीसुद्धा घडलं होतं. त्यावेळी हा ध्रुव युरोपच्या वर होता. ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती आणि यावेळी पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र खूपच कमकुवत होतं. यामुळेच पृथ्वीच्या अनेक भागात अल्ट्राव्हायोलेट किरणे पोहोचू लागली. ज्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी परिस्थिती खूप वाईट झाली होती.
advertisement
Side Effects of Ac : खरंच एसीची थंड हवा हाडांसाठी घातक ठरतेय? रिपोर्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती
असा काळ आला जेव्हा सौर किरणोत्सर्ग खूप वाढला होता. यामुळे मानवजातीवर विनाश ओढवला. निअँडरथल्स जगातून नामशेष झाले. पण होमो सेपियन्सनी काही अतिशय प्रभावी पद्धतींचा अवलंब केला, त्यापैकी एक म्हणजे सौंदर्यप्रसाधने. ज्यामुळे ते वाचले.
यू-एम डिपार्टमेंट ऑफ इंजिनिअरिंग अँड अँथ्रोपोलॉजीनुसार, सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, होमो सेपियन्स त्या भयानक काळात टिकून राहिले कारण त्यांना सनस्क्रीन आणि कपडे कसे वापरायचे हे माहित होते आणि या किरणोत्सर्गापासून बचाव करण्यासाठी ते गुहांचा वापर करू शकले.
भारतातील सर्वात खराब पदार्थ, FDA चाचणीतही फेल, तरी तुम्ही आवडीने खाताय
अभ्यासात असं आढळून आलं की होमो सेपियन्सनी त्यावेळी गेरू नावाचं खनिज आधीच शोधून काढलं होतं, ज्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्याची क्षमता. म्हणजेच, त्यांनी ते सनस्क्रीनसारखं कॉस्मेटिक म्हणून वापरलं. याशिवाय, होमसेपियन्सने केवळ गुहांमध्ये आश्रय घेतला नाही तर कपड्यांचा वापर देखील त्याला खूप मदत करत असे.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक अंगीत मुखोपाध्याय यांनी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि सूर्याच्या प्लाझ्माशी त्याचा परस्परसंवाद यांचा अभ्यास केला जेव्हा पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र बदललं, म्हणजेच जेव्हा उत्तर ध्रुव सरकला तेव्हा चुंबकीय क्षेत्र आजच्या तुलनेत फक्त 10 टक्के होतं आणि विषुववृत्तावर ते सर्वात कमकुवत होतं. या वेळेला लॅशॅम्प्स एक्सक्रूसिएशन म्हणतात. त्या काळात मानवांमध्ये बदल घडले. सनस्क्रीनचा वापर वाढला. शिवलेले कपडे जास्त वापरले जाऊ लागले.