आपल्या शरीरासाठी यकृत का महत्त्वाचं ?
यकृत हे आपल्या शरीरातलं सुपर कंम्प्युटर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी यकृत 500 पेक्षा जास्त काम करतं आणि ते सतत करत राहतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी अशुद्ध रक्त शुद्ध करणं, शरीरातून विषारी पदार्थ मुत्राद्वारे काढून टाकणं, अन्न पचवण्यासाठी शरीरात आवश्यक ती पाचक एंजाइम तयार करणं, प्रथिने आणि हार्मोन्ससारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टी शरीरारत सोडणं ही यकृताची काही प्रमुख कामं. याशिवाय यकृताचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे पित्त तयार करणं. याच पित्तामुळे विविध जे आपल्या शरीराला आपल्या पोटातून वाईट गोष्टी बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे यकृत निरोगी राहणं हे महत्त्वाचं ठरतं.
advertisement
आपल्यापैकी अनेकांना वाटतं की दारू पिण्याऱ्या व्यक्तीला लिव्हरचा त्रास असतो. अनेक दारूड्या व्यक्तींचा मृत्यु हा लिव्हर फेल म्हणजेच यकृत निकामी झाल्यामुळे होतो. मात्र लिव्हर निकामी होण्यात फक्त दारूच नाही, तर अन्य गोष्टीही कारणीभूत ठरत आहेत. आहारतज्ज्ञांच्या मते, अनेक पदार्थ हे यकृताच्या आरोग्यासाठी धोक्याचे असतात. अशा पदार्थांच्या वारेमाप सेवनामुळे यकृत निकामी होण्याचा धोका असतो.
मद्यपान करणं हे शरीरासाठी आणि यकृतासाठी घातक आहेच मात्र अतिप्रमाणात मद्यपान केल्याने फॅटी लिव्हरचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्याची परिणीती ही यकृत निकामी होण्यात होऊ शकते. त्यामुळे यकृताच्या स्वास्थासाठी मद्यपान करणं टाळाच. डायट फॉर डिलाइट क्लिनिक नोएडाच्या वरिष्ठ आहारतज्ञ खुशबू शर्मा यांच्याकडून जाणून घेऊयात त्या 5 पदार्थांविषयी जे दारू इतकंच यकृताचं नुकसान करू शकतात.
या गोष्टी लिव्हरसाठी धोक्याच्या
लाल मांस:
लाल मांस आणि प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये संतृप्त चरबीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे असे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो.
गोड पदार्थ :
जास्त साखर खाल्ल्याने यकृताचं आरोग्य धोक्यात येतं. तुम्हाला जास्त गोड पदार्थ किंवा साखर खाण्याची सवय असेल तर तुमच्या यकृताला धोका आहे. कारण साखरेचं रूपांतर हे चरबीत होतं आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
फास्ट फूड किंवा जंक फूड:
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज अशा प्रकारचे फास्ट फूड देखील यकृताच्या आरोग्यासाठी धोक्याचे मानले जातात. या गोष्टींच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हरचा धोका तर वाढतोच पण शरीरातल्या वाईट कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढते ज्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो.
मीठ:
मिठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये पाणी साचतं. ज्यामुळे यकृताला सूज येते. मिठाच्या अतिसेवनामुळे यकृतातील पेशींचा आकारही बिघडू शकतो.
औषधं:
आपल्याला एखादा त्रास झाला की आपण औषधं घेतो मात्र ही औषधं ही यकृतासाठी धोक्याची ठरू शकतात. विशिष्ठ प्रकारच्या अँटिबायोटिक्समुळे यकृताचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.