Liver Detox drinks: काय सांगता! ‘हे’ ड्रिंक्स ठरतील लिव्हरसाठी टॉनिक; दूर होईल फॅटी लिव्हरचा त्रास

Last Updated:

Benefits of Liver Detox drinks in Marathi: यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. प्रथिनं तयार करण्यापासून ते पचनापर्यंत आणि शरीरालातले विषारी, अपायकारक घटक बाहेर काढून फेकण्याचं कामं आपलं यकृत म्हणजेच लिव्हर हे 24 तास न थकता करत असतं. त्यामुळेच आपल्या लिव्हरची योग्य काळजी घेणं हे क्रमप्राप्त ठरतं.

प्रतिकात्मक फोटो :‘हे’ ड्रिंक्स आहेत लिव्हरसाठी  टॉनिक; पळून जाईल फॅटी लिव्हर
प्रतिकात्मक फोटो :‘हे’ ड्रिंक्स आहेत लिव्हरसाठी टॉनिक; पळून जाईल फॅटी लिव्हर
मुंबई: यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. प्रथिनं तयार करण्यापासून ते पचनापर्यंत आणि शरीरालातले विषारी, अपायकारक घटक बाहेर काढून फेकण्याचं कामं आपलं यकृत म्हणजेच लिव्हर हे 24 तास न थकता करत असतं. त्यामुळेच आपल्या लिव्हरची योग्य काळजी घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. सध्या बदललेली जीवनशैली, जंक फूड, प्रदूषण, मद्यपान, कोंल्ड्रिक्सच्या अतिवापर आणि तणावामुळे यकृतावरचा भार हा अधिक वाढलाय. त्यामुळे तुम्हाला तुमच्या यकृताची काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं.

इतकी कामं न थकता करतं यकृत

डॉ. सुदीप खन्ना यांच्या मते, यकृत स्वतःला  स्वच्छ ठेवण्यासोबत अन्य 500 पेक्षा जास्त कामं करतं. त्यामुळे जर यकृतावरच्या कोणत्याही एका कामाचा भार वाढला तर दुसऱ्या कामावर परीणाम होतो. जे अन्न आपण खातो त्या अन्नामध्ये पोषकतत्त्वं जरी असली तरीही ती पचवण्यासाठी यकृतालच पुन्हा मेहनत करावी लागते. त्यामुळे आपल्या गरज पडते ती यकृत शुद्ध करणाऱ्या म्हणजेच लिव्हर डिटॉक्सिफिकेशनला मदत करणाऱ्या पेयांची.
advertisement
जाणून घेऊयात कोणती पेय यकृतासाठी फायद्याची ठरतात.

आलं लिंबाचं पाणी:

Detox drinks for Liver: ‘हे’ ड्रिंक्स ठरतील लिव्हरसाठी टॉनिक; दूर होईल फॅटी लिव्हरचा त्रास
advertisement
लिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे आपल्याला माहितीच आहे. डॉ. सुदीप खन्ना म्हणतात की, हे लिंबाचं पाणी यकृताला स्वच्छ आवश्यक ते एंझाइम्स तयार करतात. आल्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे पचनासाठी फायद्याचे ठरतात. त्यामुळे पचनादरम्यान तयार होणारे विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यात आलं लिंबाचं पाणी यकृतासाठी फायदेशीर ठरू शकतं.
advertisement

बीटरूट ज्यूस :

Detox drinks for Liver: ‘हे’ ड्रिंक्स ठरतील लिव्हरसाठी टॉनिक; दूर होईल फॅटी लिव्हरचा त्रास
advertisement
यकृताचे कार्य सुधारण्यासाठी आणि पेशींचे पुनरुत्पादन करण्यासाठी बीटरूटचा ज्यूस फायद्याचा आहे. बीटरूटमध्ये बीटाइन अँटीऑक्सिडंट्स, नायट्रेट्स आणि फायबर असतात, ज्यामुळे पित्त काढून टाकयला किंवा कमी व्हायला मदत होते. ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी बीटरूट ज्यूस पिणं हे यकृताच्या आरोग्याच्या फायद्याचं मानलं जातं.

हळदीचं पाणी:

Detox drinks for Liver: ‘हे’ ड्रिंक्स ठरतील लिव्हरसाठी टॉनिक; दूर होईल फॅटी लिव्हरचा त्रास
advertisement
आयुर्वेदातलं सोनं अशी हळदीची ओळख आहेत. हळदीतच्या दाहक विरोधी गुणधर्मांचा यकृताला फायदा होतो. याशिवाय हळदीतलं कर्क्यूमिन हे विषारी पित्तामुळे होणाऱ्या संभाव्य हानीपासून यकृताच्या पेशींचे संरक्षण करतं. त्यामुळे हळदीचं पाणी प्यायल्याने यकृताचं आरोग्य सुधारतं.

ग्रीन टी :

Detox drinks for Liver: ‘हे’ ड्रिंक्स ठरतील लिव्हरसाठी टॉनिक; दूर होईल फॅटी लिव्हरचा त्रास
advertisement
ग्रीन टी एक उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट मानलं जातं.  ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन यकृतावर जमलेली चरबी कमी करण्यास आणि रोगांपासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करते. ग्रीन टीच्या नियमित वापरामुळे विषारी द्रव्यं जमा होण्याचं प्रमाण कमी होतं. पर्यायाने यकृतावरचा ताण कमी होऊन यकृताचं आरोग्य सुधारतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Liver Detox drinks: काय सांगता! ‘हे’ ड्रिंक्स ठरतील लिव्हरसाठी टॉनिक; दूर होईल फॅटी लिव्हरचा त्रास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement