अयोध्या: गेल्या जानेवारीत अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि भाविकांबरोबर पर्यटकांसाठीही अयोध्यानगरी आकर्षण बनली. आता मंदिरानंतर सगळ्या शहरानेच कात टाकायला सुरुवात केली आहे. अयोध्येत दिवसेंदिवस दाखल होणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता आता शहरात इतर सोयी-सुविधादेखील निर्माण व्हायला लागल्या आहेत. अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांना आता दीपोत्सवापूर्वी आणखी एक सुविधा मिळणार आहे. अयोध्या विकास प्राधिकरण ओपन रेस्टॉरंट बांधत आहे. येथे येणारे पर्यटक आणि भाविकांना सात्त्विक भोजनाची चव चाखता येणार आहे. यासोबतच येथे फूड प्लाझाही उभारण्यात येणार असून, तेथे रामभक्तांना विविध प्रकारच्या पदार्थांची चव चाखता येणार आहे.
advertisement
दीपोत्सवापूर्वी सुरू होणार ओपन रेस्टॉरंट
राम की पैडीजवळ हे ओपन रेस्टॉरंट उभारणार आहेत. वास्तविक, वि अयोध्या विकास प्राधिकरण ओपन रेस्टॉरंट बांधत आहे. येथे येणारे पर्यटक आणि भाविकांना सात्त्विक भोजनाची चव चाखता येणार आहे कास प्राधिकरण अयोध्येत राम की पैडीजवळ ओपन रेस्टॉरंट आणि फूड प्लाझा बांधत आहे. दीपोत्सवापूर्वी हे काम पूर्ण होईल. एवढेच नव्हे तर या संपूर्ण परिसरात 80 ते 85 दुकानेही बांधली जात आहेत. याची उभारणी अयोध्या विकास प्राधिकरणाकडून केली जात आहे. याच्या वर ओपन रेस्टॉरंट बांधण्यात येणार असून, तेथे रामभक्तांना सात्विक पदार्थ घेता येणार आहेत.
सुमारे ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चून हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यात येत आहे. याशिवाय या संपूर्ण परिसरात पार्किंग झोनही तयार करण्यात येणार असून, तेथे भाविकांना आपली चारचाकी वाहने पार्क करता येणार आहेत.
अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, राम की पैडीजवळ विकास प्राधिकरणाचे संकुल बांधण्यात आले होते. पण त्याची अवस्था अगदी दयनीय होती. आता तिथे आणखी भव्य आणि व्यापक काही करायला स्कोप होता. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करून अयोध्या विकास प्राधिकरणाने गृहनिर्माण विकास संकुलाला पाठविला. ज्याला मान्यताही देण्यात आली आहे. तेथे नवीन व जुनी मिळून सुमारे ८० ते ८५ दुकाने उभारण्यात येणार आहेत. याशिवाय हा संपूर्ण परिसर फूड प्लाझा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय एक ओपन रेस्टॉरंट बांधण्यात येणार आहे, जिथे अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांना सात्विक भोजन दिले जाणार आहे. दीपोत्सवापूर्वी हे बांधकाम पूर्ण होईल, असे गौरव दयाल यांंनी सांगितले.