अमेरिकेतील हे कपल एक कपल गेल्या 19 वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होतं. या जोडप्यामध्ये पुरूषाला अॅझोस्पर्मिया नावाची वंध्यत्वाची समस्या होती. जी अमेरिकेतील एकूण वंध्यत्वाच्या 10 टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे. अॅझोस्पर्मिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणू आढळत नाहीत किंवा ते इतके लहान आणि लपलेले असतात की मानवांना ते शोधणं कठीण होते. या समस्येची दोन कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया, म्हणजे जेव्हा शुक्राणूंच्या मार्गात अडथळा येतो. दुसरं म्हणजे नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे आपलं शरीर स्वतःहून शुक्राणू तयार करण्यास असमर्थ आहे.
advertisement
Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...
म्हणून या कपलने आयव्हीएफची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुमारे 15 वेळा आयव्हीएफ केलं पण ते फेल झालं. प्रत्येक वेळी त्यांना निराशाच मिळाली. शेवटी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टरांनी एआयच्या मदतीने असा चमत्कार केला आणि ती महिला प्रेग्नंट झाली.
डॉक्टरांच्या मदतीने या कपलने 'स्टार' नावाची एक नवीन चाचणी घेतली. STAR म्हणजेच स्पर्म ट्रॅकिंग आणि रिकव्हरी. या चाचणीत एआयचा वापर करण्यात आला आहे. येथे AI ने असं काम केलं जे मानवी डोळे करू शकत नाहीत. STAR तंत्रज्ञानाने बनवलेलं हे मशीन 1 तासात 80 लाख फोटो काढू शकते. यात AI सर्वात लहान लपलेले शुक्राणू देखील शोधतं आणि नंतर हे शुक्राणू एका विशेष मशीनद्वारे सुरक्षितपणे वेगळे केले जातात. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डॉक्टरांना सुमारे 5 वर्षे लागली.
लग्नानंतर 8 वर्षांनी झालं बाळ, पण नीट दूध पित नव्हतं, कारण असं की आईच्या काळजात चर्रर्र
STAR AI तंत्रज्ञानाचा वापर करून, डॉक्टरांनी पुरूषाच्या वीर्यामध्ये लपलेले निरोगी शुक्राणू काढले आणि यापैकी एक शुक्राणू अंड्यामध्ये टाकण्यात आला. दीर्घ प्रतीक्षेनंतर महिला गर्भवती राहिली. या जोडप्याला 19 वर्षांनी पालक होण्याचा आनंद मिळणार आहे.
पुरुष आणि महिला दोघांमध्येही वंध्यत्व ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. जगभरात हजारो जोडपी आहेत ज्यांना पालक होण्याचा आनंद मिळत नाही. पण आता आयव्हीएफ आणि सरोगसीसारख्या वैद्यकीय तंत्रांनी ही समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवली गेली आहे. तरी काही प्रकरणांमध्ये आयव्हीएफदेखील यशस्वी होत नाही. इथं एआय आपली कमाल दाखवत आहे.