मधुमेहाचा वाढता धोका पाहता, जास्त साखर असलेला चहा तब्येतीसाठी घातक ठरु शकतो. मधुमेहाचा धोका वाढतोच तसंच वजन वाढणं, त्वचा आणि हृदयरोग देखील यामुळे होऊ शकतो. यावर एक उपाय म्हणजे, साखर टाळूनही चहा गोड बनवू शकता. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर साखरेपेक्षा आरोग्यासाठी खूप चांगला आहे.
Digestion : पोट निरोगी, पचन सुरळीत ठेवण्यासाठीचा कानमंत्र, ही फळं ठेवतील पोट ताब्यात
advertisement
मध - चहा गॅसवरुन काढला की त्यानंतर त्यात मध घाला. जेणेकरून त्यातील पोषक घटकांचं नुकसान होणार नाही. यात अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. वजन नियंत्रण आणि पचनासाठी देखील मध फायदेशीर आहे. साखरेच्या प्रमाणात मध घाला.
गूळ - गूळ हा देशी आणि पौष्टिक पर्याय आहे. गावांगावांमधे गुळाचा चहा अजूनही दररोज केला जातो. गुळात लोह आणि खनिजं आहेत. चव नक्कीच वेगळी लागेल पण साखरेपेक्षा आरोग्यासाठी गूळ चांगला असं तज्ज्ञ सांगतात. पण, लक्षात ठेवा की गूळ घातल्यानंतर चहा जास्त उकळू नका.
ज्येष्ठमध - आयुर्वेदात ज्येष्ठमधाचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. ज्येष्ठमध नैसर्गिकरित्या गोड असतो आणि खोकला आणि सर्दीमधे ज्येष्ठमध वापरल्यानं आराम मिळतो. दालचिनी आणि लवंग मिसळून हर्बल चहा बनवू शकता.
Health Tips : दूध - मधाचं मिश्रण करेल जादू, शरीराला पोषण देणारं सुवर्ण अमृत, वाचा सविस्तर
खजूर सरबत - खजूर सरबत खूप घट्ट आणि गोड असतं, त्यामुळे ते कमी प्रमाणात घाला. त्यात फायबर आणि खनिजं असतात यामुळे ऊर्जा वाढते.
सुकामेवा - मनुका आणि खजूर वापरुन चहा करता येईल. दुधात मनुका आणि खजूर उकळून चहा बनवता येतो.
हा चहा नेहमीच्या चहापेक्षा पौष्टिक असेल.
खूप गोड चहा आवडत नसेल तर हे सर्वोत्तम पर्याय आहेत. म्हणजेच, चहाला गोड चव देण्यासाठी साखर हा एकमेव पर्याय नाही. मध, गूळ, ज्येष्ठमध, खजूर सरबत आणि सुकामेवा या पाच गोष्टींनी चहा गोड होईलच, पण आरोग्यालाही हानी होणार नाही.