मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय. या सोहळ्यानिमित्त केवळ अयोध्या नगरीतच नाही, तर देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक भक्त श्रीरामाच्या स्वागतासाठी आपापल्या परीने तयारी करीत आहेत. आता मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमधील पानेरी शॉप देखील ह्या सोहळ्यात आपल्या युनिक पद्धतीने सहभाग दाखवत आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या दुकानात एक अतिशय खास साडी तयार केली आहे. ज्यातून फॅशन आणि भक्तीचा एक मिलाफ पाहायला मिळतोय.
advertisement
साडीवर राम मंदिर
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कुठे लाखो लाडू बनवण्याची तयारी सुरू आहे; तर कुठे सर्वांत मोठी अगरबत्ती अयोध्या नगरीत पोहोचवली जात आहे. कुठे बॅनर दिसत आहे, तर कुठे झेंडे आणि विद्युत रोषणाई दिसत आहे. दादरमधील (प ) स्टेशनपासून अगदी 8 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या पानेरी या दुकानात चक्क साडीवरच भगवान श्रीराम आणि अयोध्येतील राम मंदिराचे डिझाईन प्रिंट केले आहे. या खास साडीने सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे तसेच आतापर्यंत अनेक साचड्या विकल्या असल्याची माहिती दुकानदाराने दिली आहे.
मुंबईत हुबेहुब राम मंदिर, इमारतीच्या प्रवेशद्वारावरच साकारली भव्य प्रतिकृती, Video
कशी आहे खास साडी?
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या साड्या आकर्षणाचा भाग ठरू शकतात. ही साडी साईड स्क्रॅप मटेरियलची असून त्यावर स्क्रीन प्रिंट आहे. तसेच त्यावर मंदिरा सोबतच जय श्री राम आणि अयोध्या असेही लिहिलेलं आहे. ही साडी बनवण्याचा कालावधी हा 15 ते 20 दिवसांचा आहे. साडीची किंमत 1950 रुपये इतकी असणार आहे. लोकांचा प्रतिसाद बघता अजून साड्या बनवण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती दुकानदारांनी दिली.