advertisement

Power Nap : World Sleep Day, झोप म्हणजे अनेक समस्यांचं उत्तर, जाणून घ्या दुपारच्या छोट्या झोपेचं महत्त्व

Last Updated:

आपली सध्याची जीवनशैली, धावपळ आणि कामाचा ताण, रात्री उशीरा झोपणं, सकाळी लवकर उठणं अशा सगळ्यांचा आरोग्यावर परिणाम होतो. या सगळ्यात दुपारची छोटीशी झोप खूप महत्त्वाची आहे.

News18
News18
मुंबई : World Sleep Day च्या निमित्तानं समजून घेऊया झोपेचं महत्त्व. शारीरिक - मानसिक आरोग्यासाठी झोप तर आवश्यक आहेच पण दुपारची काही मिनिटांची डुलकीही तुम्हाला रिचार्ज करु शकते.
आज 13 मार्च..World Sleep Day. या दिवसाचा उद्देश लोकांना चांगल्या आणि पुरेशी झोपेचं महत्त्व शिकवणं आहे. कारण योग्य झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्यानं अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
आपली सध्याची जीवनशैली, धावपळ आणि कामाचा ताण, रात्री उशीरा झोपणं, सकाळी लवकर उठणं अशा सगळ्यांचा आरोग्यावर परिणाम होतो. या सगळ्यात दुपारची छोटीशी झोप खूप महत्त्वाची आहे.
advertisement
दरवर्षी World Sleep Day एका थीमसह साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे 'sleep well live better' ही थीम शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी चांगली झोप सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी निवडण्यात आली आहे.
advertisement
बहुतेकांकडून ऐकलं असेल की त्यांना जेवणानंतर झोप येते. विशेषतः उन्हाळ्यात, काही लोकांना जास्त झोप येते. खरं तर, दुपारी झोप येणं ही एक सामान्य जैविक प्रक्रिया आहे, जी प्रामुख्यानं आपल्या शरीराच्या सर्कॅडियन रिदममुळे होते, ज्यामुळे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान उर्जेमधे घट होते.
ऑफिसमध्ये असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही एक छोटीशी झोप घेऊ शकता. दुपारची झोप घेणं चांगलं. संध्याकाळनंतर पॉवर नॅप घेणं टाळा, कारण यामुळे तुमची रात्रीची झोप बिघडू शकते. खुर्चीवर किंवा डेस्कवर डोकं ठेवूनही झोप घेता येते. फक्त तुमच्या मानेला आधार आहे याची खात्री करा.
advertisement
काही मिनिटांच्या डुलकीचे फायदे -
ऊर्जा - पॉवर नॅप घेतल्यानं मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.
advertisement
ताण - पॉवर नॅप घेतल्यानं ताण कमी होण्यास मदत होते, कारण ते कॉर्टिसोलसारखं ताण संप्रेरक कमी करण्यास मदत करते.
चिडचिड - पॉवर नॅप घेतल्यानं तुमचा मूड सुधारू शकतो, कारण झोपेचा अभाव अनेकदा चिडचिड निर्माण करु शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Power Nap : World Sleep Day, झोप म्हणजे अनेक समस्यांचं उत्तर, जाणून घ्या दुपारच्या छोट्या झोपेचं महत्त्व
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement