बराक ओबामांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 2025 मधील त्यांच्या आवडत्या गाण्यांची यादी शेअर केली आहे. या प्लेलिस्टमध्ये विविध भाषांतील, वेगवेगळ्या शैलीतील गाणी असून ती त्यांच्या जागतिक अभिरुचीचे दर्शन घडवते. विशेष म्हणजे, या यादीत मराठी भक्तीपरंपरेतील 'पसायदान' या अभंगालाही स्थान मिळाले आहे.
बराक ओबामांची आवडती गाणी..
ओबामांना आवडलेले 'पसायदान' ही प्रार्थना प्रसिद्ध महिला गायिका गाणव्य यांनी गायले आहे. हे गाणे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या 'निलाम' या अल्बममध्ये सादर केले होते. गाणव्य यांनी हे पसायदान त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही शेअर केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही मराठी संस्कृतीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
advertisement
पसायदानव्यतिरिक्त ओबामांच्या 2025 च्या प्लेलिस्टमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांची गाणी समाविष्ट आहेत. यामध्ये ओलिव्हिया डीन याचं नाइस टू इच अदर, लेडी गागा याचं अब्राकाडाब्रा, एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड याचं नेव्हर फेल्ट बेटर, केंड्रिक लामार आणि एसझेडए याचं लूथर, गुन्ना याचं जस्ट से डेंट, व्हिक्टोरिया नोएल याचं इन द नेम ऑफ लव्ह यांचा समावेश आहे.
बराक ओबामांचे आवडते चित्रपट..
संगीताबरोबरच बराक ओबामांनी 2025 मधील आपले आवडते चित्रपटही जाहीर केले आहेत. त्यांच्या यादीत आवडत्या चित्रपटांमध्ये, वन बॅटल आफ्टर अनदर, सिनर्स, इट वॉज जस्ट अॅन अॅक्सिडेंट, हॅमनेट, सेंटिमेंटल व्हॅल्यू, नो अदर चॉईस, द सिक्रेट एजंट, ट्रेन ड्रीम्स, जे केली, गुड फॉर्च्यून आणि ऑर्वेल : 2+2=5 या चित्रपटांचा समावेश आहे. ही यादी त्यांच्या सखोल आणि विचारप्रवर्तक कलाकृतींवरील प्रेम दर्शवते.
बराक ओबामांची आवडती पुस्तकं..
ओबामांची पुस्तकांची निवडही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत बेथ मेसी लिखीत 'पेपर गर्ल', सुसान चोई लिखीत 'फ्लॅशलाइट', जिल लेपोर लिखीत 'वी द पीपल', अँजेला फ्लॉर्नोय लिखीत 'द वाइल्डरनेस', ब्रायन गोल्डस्टोन लिखीत 'देअर इज नो प्लेस फॉर अस' यांचा समावेश आहे.
याशिवाय इथन रदरफोर्ड लिखीत नॉर्थ सन, अँड्र्यू रॉस सॉर्किन लिखीत १९२९, किरण देसाई लिखीत 'द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी', झेंडी स्मिथ लिखीत 'डेड अँड अलाइव्ह', इयान मॅक्युएन लिखीत 'व्हॉट वी कॅन नो' आणि मिशेल ओबामा यांचं 'द लूक' ही पुस्तकेही त्यांच्या आवडीच्या यादीत आहेत.
बराक ओबामांची 2025 ची ही प्लेलिस्ट केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, ती विविध संस्कृती, विचारधारा आणि कला यांचा संगम दर्शवते. विशेषतः संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘पसायदान’चा समावेश हा भारतीय अध्यात्म आणि मराठी परंपरेसाठी जागतिक स्तरावर मिळालेली एक महत्त्वाची दाद मानली जात आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
