हिवाळ्यात तापमान कमी होतं तेव्हा घसा खवखवणं, शिंका येणं आणि सर्दी यासारख्या तक्रारी जाणवतात. यामुळे अनेकदा लोक सिरप आणि औषधं घेतात, पण, यासाठी आजीबाईच्या बटव्यातला म्हणजे एक पारंपरिक उपाय लागू पडतो. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे गूळ आणि सुंठ. आयुर्वेदातही नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे दोन्ही घटक महत्त्वाचे मानले जातात.
advertisement
Fruits for Skin : हिवाळ्यातही त्वचा दिसेल चमकदार, समजून घेऊया फळांचं महत्त्व
गूळ आणि सुंठाचे फायदे - आयुर्वेदानुसार, गूळ आणि सुंठ या दोन्हीचीही प्रकृती उष्ण असते. शरीरात साचलेला कफ विरघळण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरतात. गुळामुळे श्वसनमार्ग स्वच्छ राहतो आणि त्यात भरपूर लोह असल्यानं हिमोग्लोबिन वाढतं, ज्यामुळे शरीराला थंडीशी लढण्याची शक्ती मिळते.
सुंठ म्हणजेच सुक्या आल्यात असलेल्या जिंजेरॉलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे फुफ्फुसातील सूज कमी करण्यास आणि संसर्ग दूर करण्यास मदत होते.
प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमधे खोकला, सर्दी आणि जास्त कफ यावर उपचार म्हणून याची माहिती देण्यात आली आहे. कोरड्या खोकल्यासाठी, गूळ आणि सुंठ मिसळून छोट्या गोळ्या बनवता येतात. अर्धा कप किसलेला गूळ घ्या, त्यात दोन चमचे सुंठ पावडर आणि चिमूटभर काळी मिरी घाला, थोडं तूप घाला आणि गोळ्या बनवा.
दिवसातून दोन-तीन वेळा एकेक गोळी चोखल्यानं घसा खवखवणं आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
Sankrant Special : संक्रांतीला हेच पदार्थ का ? जाणून घ्या ऋतूनुसार आहाराचं महत्त्व
कफ बाहेर काढण्यासाठी कोमट काढा देखील फायदेशीर आहे. एक ग्लास पाण्यात गूळ आणि सुंठ घालून ते थोडं उकळवा आणि झोपण्यापूर्वी प्या. यामुळे छातीतील कफ साफ करण्यास मदत होते. दरम्यान, शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी सुंठ आणि गुळाचे लाडू बनवण्याची जुनी परंपरा आहे. सकाळी दुधासोबत हे लाडू खाल्ल्यानं सर्दी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गूळ आणि सुंठाची मूळ प्रकृती उष्ण आहे. त्यामुळे या दोन्हीचं सेवन कमी प्रमाणात करा. नाकातून रक्त येणं, मूळव्याध किंवा पोटात अल्सर सारख्या समस्या असलेल्यांनी याचं सेवन कमी प्रमाणात करावं. नेहमी गडद रंगाचा किंवा सेंद्रिय गूळ निवडा. कोमट पाणी किंवा तुपासोबत ते खाणं चांगलं मानलं जातं.
