TRENDING:

Fat Loss : वजन कमी करण्याचा फंडा, Intermittent fasting नं होईल चरबी कमी, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

Last Updated:

जीवनशैलीतले बदल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, आज बहुतेकांना लठ्ठपणा आणि त्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे कालांतरानं अनेक गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, वजन संतुलित राखणं अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी Intermittent fasting हा एक चांगला पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लठ्ठपणा कमी कसा करायचा हा प्रश्न बहुतेकांना असतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करुनही यश येत नाही.
News18
News18
advertisement

जीवनशैलीतले बदल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, आज बहुतेकांना लठ्ठपणा आणि त्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे कालांतरानं अनेक गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, वजन संतुलित राखणं अत्यंत महत्वाचं आहे.

डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, डॉक्टरांनी पोटाची चरबी कमी करण्याचे तीन सोपे आणि परिणामकारक मार्ग सांगितले आहेत.

advertisement

Home Made ORS: ORS म्हणजे काय ? शरीराला ORS ची आवश्यकता कधी असते ?

12:12 Intermittent Fasting - वजन कमी करण्यासाठी Intermittent Fasting हा एक चांगला पर्याय आहे. पहिल्यांदाच Intermittent Fasting करत असाल तर 12:12 चं वेळापत्रक वापरून पहा. म्हणजेच, तुमच्याकडे जेवण्यासाठी दिवसातले बारा तास आहेत आणि उर्वरित बारा तास काहीही खाऊ नका. दोन जेवणांमधे बारा तासांचं अंतर ठेवा. सकाळी सात वाजता जेवलात तर दिवसातलं शेवटचं अन्न संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोटात जायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत उपवास कराल. या पद्धतीमुळे पचन सुधारतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

advertisement

Intermittent Fasting दरम्यान कॅलरी नसलेलं पेयं प्या असा सल्ला डॉ. सेठी यांनी दिला आहे. यासाठी ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक टी, एपल सायडर व्हिनेगर, लिंबू पाणी (साखर नाही), बडीशेप किंवा तुळशीचं पाणी, कॅमोमाइल किंवा आल्याचा चहा पिऊ शकता. या पेयांमुळे शरीरातील विषारी पदार्थ कमी व्हायला मदत होते. भूक नियंत्रित राहते.

advertisement

Blood Pressure: उच्च रक्तदाबामुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, आतापासूनच बदला सवयी

जेवणाच्या वेळी उच्च फायबर आणि उच्च प्रथिनयुक्त आहार घ्या - पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही सर्वात महत्वाची पायरी आहे. जेवणाच्या वेळी उच्च फायबर आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. पनीर, टोफू, चणे, अंडी, चिकन आणि मासे यासारखे उच्च प्रथिनयुक्त पदार्थ खाऊ शकता. फळं, भाज्या, सॅलड, ओट्स आणि डाळी यांसारखे उच्च फायबरयुक्त पदार्थ खा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर गडगडले, सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

प्रथिनं आणि फायबरमुळे जास्त काळ पोट भरलेलं राहतं, जास्त खाण्यापासून रोखण्यास मदत होते आणि चरबी जाळण्यासाठी म्हणजेच fat burningला यामुळे गती मिळते. दिनचर्येत, खाण्यापिण्याच्या सवयीत मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fat Loss : वजन कमी करण्याचा फंडा, Intermittent fasting नं होईल चरबी कमी, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल