बेसन दूध ज्याला बेसनची खीर किंवा सुडका म्हणतात. यासाठी बेसन, काळी मिरीपूड, हळद, सुंठ पावडर, बदाम-पिस्ताचे काप, केसर, दूध, गूळ पावडर, तूप इतकं साहित्य लागेल. आता बेसन दूध कसं बनवायचं ते पाहुयात.
advertisement
एका भांड्यात थोडं तूप घेऊन ते गॅसवर ठेवा. तुपात बेसन आणि काळी मिरीपूड टाकून चांगलं परतून घ्या. त्यात हळद आणि सुंठ पावडर टाका. बदाम आणि पिस्ताचे काप करून टाका. नीट परतून घ्या आणि आता यात दूध आणि केसर टाका. केसर हवं असेल तरच टाका. नाही टाकलं तरी चालेल. आता दुधाला 2-3 वेळा उकळी येऊ द्या. आता यात गूळ पावडर टाका. नीट ढवळून घ्या. सुडका किंवा बेसनचं दूध तयार. एका ग्लासमध्ये काढून वरून ड्रायफ्रूट्सने सजवून सर्व्ह करा. हिवाळ्यात हे प्यायल्याने खूप छान झोप लागते, असा सांगण्यात आलं आहे.
@MeghnasFoodMagic युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हे बेसन दूध बनवून पाहा आणि कसं वाटलं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवाय हिवाळ्यात तुम्ही अशा प्रकारे आणखी कोणती खास, हटके रेसिपी बनवत असाल तर तीसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.
